Goa Energy Development Agency to hire 50 EV
Goa Energy Development Agency to hire 50 EVDainik Gomantak

गोवा सरकारचा 'गो ग्रीन'चा नारा, भाडे करारावर घेणार 50 इलेक्ट्रिक वाहने

लोकांनी इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीला प्राधान्य द्यावे असे आवाहन वारंवार सरकारच्या वतीने केले जाते.
Published on

Goa Energy Development Agency to hire 50 EV: गोवा सरकार इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी आणि वापराला प्रोत्साहन देत आहे. सरकारने मागील अधिवेशनात EV वाहनांसाठी सवलत बंद करण्याचा निर्णय घेतला असला तरी, लोकांनी इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीला प्राधान्य द्यावे असे आवाहन वारंवार सरकारच्या वतीने केले जाते.

याबाबत आता गोवा ऊर्जा विकास संस्थेने 'गो ग्रीन'चा नारा देत 50 इलेक्ट्रिक वाहने भाडे करारावर घेण्याचा निर्णय घेतलाय.

गोवा ऊर्जा विकास संस्था (GEDA) विविध सरकारी खात्याच्या वापरासाठी 50 इलेक्ट्रिक वाहने भाडे करारावर घेणार आहे. पाच वर्षांसाठी हा भाडे करार असेल तर, पुढे दोन वर्षे त्याचा कालावधी वाढवला जाईल. याप्रकरणी GEDA लवकरच निविदा मागवणार असल्याची माहिती समोर आली आहे. 50 पैकी पंधरा वाहने चालकासहित घेतली जातील तर, 50 चालकाविना घेतली जाणार आहेत. असे टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

वाहनांवर अनुभवी EV चालक नेमले जाणार असून, त्यासाठी वाहन परवाना आवश्यक असेल. भाडे करारावर घेण्यात आलेली वाहने कोणत्याही सरकारी खात्याला दिली जातील तसेच, मागणीनुसार त्यांची संख्या देखील वाढवली जाईल.

Goa Energy Development Agency to hire 50 EV
Goa Tweeter War: 'गोव्यात येण्यापूर्वी जनरेटरची सोय आहे का चेक करा', महिला उद्योजक बोलली अन् सुरू झालंय 'ट्विटर वॉर'

राज्यातील कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवणे गरजेचे असल्याचे देखील GEDA ने म्हटले आहे. राज्य सरकारने यापूर्वी देखील काही विभागांसाठी इलेक्ट्रिक वाहने खरेदी केली आहेत, तसेच नवीन 50 वाहनांमुळे त्या संख्येत वाढ होणार आहे.

दरम्यान, भाडे करारावर घेण्यात आलेले इलेक्ट्रिक वाहनांची कोणत्याही सरकारी विभागासाठी नियुक्त केली जाऊ शकते. त्याला संबधितांना नकार देता येणार नाही. तसेच, वाहनांना राज्याच्या बाहेर जाण्याची देखील गरज भासू शकते. त्यावेळी टोलसाठीचा खर्च संबधित विभागाकडून घेतला जाणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com