Miramar Beach: सकारात्मक! आता दिव्यांगानाही मिरामारचे सौंदर्य अनुभवता येणार

येत्या दोन वर्षात पणजीला देशातील पहिले दिव्यांगासाठी सुसह्य असणारे शहर करण्यासाठी प्रयत्नशील
Miramar Beach
Miramar BeachDainik Gomantak

Purple Fest 2023: समुद्र किनाऱ्यांचे सौंदर्य अनुभवायला कोणाला आवडत नाही. अनेकजण तासंतास सागरी किनारी बसून निवांतपणा अनुभवत असतात. पण, अपंग लोकांना विविध समस्यांमुळे सागरी किनारी पोहोचता येत नाही. याचसाठी आता गोव्यात होऊ घातलेल्या पर्पल फेस्तने (Purple Fest) पुढाकार घेतला आहे. त्यामुळे विविध कारणांमुळे अंपगत्व आलेल्या लोकांना मिरामारच्या (Miramar Beach) निसर्गरम्य समुद्र किनाऱ्याची अनुभूती घेता येणार आहे.

Miramar Beach
Goa Petrol Diesel Price: गोव्यात पेट्रोल डिझेलच्या दरात किरकोळ बदल, जाणून घ्या इंधनाचे आजचे दर

जगप्रसिद्ध मिरामार बीचवर अपंग लोकांना जाता यावे यासाठी सुविधा निर्माण केल्या जात आहेत. यासाठी रॅम्प देखील उभारला जात असून, या रॅम्पच्या मदतीने अपंगांना बीचपर्यंत जाता येऊ शकते. गोव्यात जानेवारीत पर्पल फेस्ट होणार आहे. यापार्श्वभूमीवर दोना पाऊला ते मनोरंजन सोसायटी या भागात सर्वेक्षण करण्यात आले असून, रॅम्प टाकण्यासाठी जागा उपलब्ध असल्याचे सर्वेक्षणात दिसून आले आहे.

Miramar Beach
Circuit Bench at Goa: गोव्यात कार्यरत जवान आणि माजी सैनिकांसाठी सर्किट बेंच

राज्य दिव्यांग विभागाचे आयुक्त गुरूप्रसाद पावसकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, "गोव्यात सध्याच्या घडली 19 शासकीय इमारती आहेत. जिथे दिव्यांग लोकांसाठी ये-जा करण्यासाठी सुविधा उपलब्ध आहे. अशाच सुविधा बँका, शाळा आणि पर्यटन क्षेत्रात निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. येत्या दोन वर्षात पणजीला देशातील पहिले दिव्यांगासाठी सुसह्य असणारे शहर करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत."

तसेच, येत्या काळात कोलवा, बागा आणि हरमल बीच देखील दिव्यांगासाठी उपलब्ध होतील. याशिवाय गोव्यातील 40 सरकारी इमारतीही सुसज्ज असतील. असे पावसकर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com