Pramod Yadav
गोव्यात सध्या कार्यरत जवान आणि माजी सैनिकांसाठी न्याय मिळण्याची सुविधा गोव्यातच उपलब्ध होणार आहे. सशस्त्र दल न्यायाधिकरणचे मुंबई येथील प्रादेशिक खंडपीठ, प्रथमच गोव्यात सर्किट बेंच सुरु करत आहे. यामुळे सध्या कार्यरत जवान आणि माजी सैनिकांना जलद न्याय मिळण्यासाठी मदत होणार आहे.
(Armed Forces Tribunal’s Circuit Bench at Goa to be Inaugurated on 21 Dec 22)
मुंबई उच्च न्यायालयाने गोव्यातील त्यांची जागा सशस्त्र दल न्यायाधिकरणाला वापरण्यासाठी संमती दिली आहे. गोव्यातील सर्किट बेंचचा उद्घाटन 21 डिसेंबर 2022 रोजी होणार आहे. नवी दिल्लीतील सशस्त्र दल न्यायाधिकरणाचे अध्यक्ष माननीय न्यायमूर्ती राजेंद्र मेनन (Justice Rajendra Menon) उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
माननीय न्यायमूर्ती यू सी श्रीवास्तव, प्रादेशिक खंडपीठ, लखनौ आणि माननीय व्हाइस अॅडमिरल अभय आर कर्वे (निवृत्त) पीव्हीएसएम , एव्हीएसएम , प्रादेशिक खंडपीठ, मुंबई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने यावर्षी जवळपास 700 प्रकरणे निकाली काढली आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.