Sonali Phogat Case: सोनालींच्या पीए सांगवानने नेमलेल्या ‘त्या’ संगणक ऑपरेटरचा शोध सुरू

पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केलेली असताना यात आणखी एक संशयित व्यक्तीचे नाव समोर येत आहे.
Sonali Phogat
Sonali PhogatDainik Gomantak

गोमन्तक वृत्तसेवा

हिसार: भाजप नेत्या सोनाली फोगट यांच्या हत्याप्रकरणातून दररोज नवीन धक्कादायक माहिती बाहेर येत आहे. पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केलेली असताना यात आणखी एक संशयित व्यक्तीचे नाव समोर येत आहे.

(search for 'that' computer operator appointed by Sonali' Phogat PA Sangwan is on)

Sonali Phogat
Goa Petrol Price: गोव्यात पेट्रोल-डिझेल महाग? जाणून घ्या आजचे दर

सोनालीचा स्वीय सहायक आरोपी सुधीर सांगवान याने शिवम नावाच्या एका व्यक्तीला सोनाली यांच्या मृत्यूच्या एक दिवस अगोदर त्यांच्या फार्म हाऊसमधील कार्यालयात संगणक ऑपरेटर म्हणून नेमले होते. सोनाली यांच्या हत्येची वार्ता हिसार येथे कळताच शिवम फार्म हाऊसमधील सीसीटीव्हीचा डीव्हीआर, लॅपटॉप व अन्य महत्त्वाची कागदपत्रे घेऊन गायब झाला. सांगवान यानेच शिवमला गायब होण्यास सांगितले, असा नातेवाईकांनी दावा केला आहे.

गोव्याचे पथक हरियाणात दाखल

सोनाली यांच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासासाठी गोवा पोलिसांचे एक पथक पोलिस निरीक्षक थेरॉन यांच्या नेतृत्वाखाली हिसारमध्ये आज मंगळवारी दाखल झाले. हे पथक सोनाली यांच्या मुलीसह इतर नातेवाईकांचा जबाब नोंदवणार आहे. याशिवाय तपासाच्या दृष्टीने लागणारे बारकावे शोधण्यासाठीही ही टीम प्रयत्न करेन अशी माहिती उत्तर गोवा अधीक्षक शोभित सक्सेना यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com