काँग्रेसचे 4 आमदार भाजपच्या संपर्कात

उर्फान मुल्ला: कामत म्हणतात ‘कोण हा मुल्ला?’
Congress
CongressDainik Gomantak

मडगाव: भाजपचे काही आमदार काँग्रेसच्या संपर्कात आहेत आणि त्यांना घेऊन भाजपविरोधी सरकार घडू शकते, असे सूतोवाच माजी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केलेले असतानाच कामत यांच्यासह काँग्रेसचे चार आमदार भाजपमध्ये येऊ पाहतात, असा सनसनाटी दावा भाजप प्रवक्ते उर्फान मुल्ला यांनी केला आहे. मात्र, मुल्ला यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवताना दिगंबर कामत यांनी ‘कोण हा मुल्ला?’ असा सवाल करीत त्यांच्या आरोपावर मी स्पष्टीकरण देण्याएवढी त्यांची राजकीय लायकी तरी आहे का? असा प्रतिसवाल केला आहे.

Congress
विजय भिकेंच्या वक्तव्‍याचा गोवा फॉरवर्डकडून निषेध

मडगावात आज भाजपचे मडगाव मंडल अध्यक्ष रुपेश महात्मे आणि सरचिटणीस केतन कुरतरकर यांच्या उपस्‍थितीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुल्ला यांनी कामत यांच्यावर पलटवार करताना, कामत स्वतःच भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या संपर्कात असल्‍याचा आरोप केला. आपल्याला कुठल्याही परिस्थितीत नव्या सरकारात स्थान मिळावे म्हणून ते प्रयत्न करत आहेत. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांनाही आपण काँग्रेस आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा भाजप उमेदवारीवर निवडणूक लढविणार असे सांगितले आहे. काँग्रेसच्या कुणालाही सरकारात घेऊ नये असे भाजपने ठरविले असून केंद्रीय नेत्यांनाही त्याची कल्पना दिली आहे, असे मुल्ला म्हणाले.

Congress
Goa Mines: 'खाणींकडे आता तरी लक्ष द्या'

असल्या आरोपांची मला पर्वा नाही

मुल्ला यांच्या आरोपाबद्दल कामत यांना विचारले असता, कोण तो मुल्ला, त्यांची राजकीय लायकी काय? असा सवाल केला. लोक मला पुरेपूर ओळखत आहेत. सगळे काँग्रेस सोडून गेले, मी एकटाच असा आमदार आहे, ज्याने काँग्रेस सोडली नाही हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे असल्या आरोपांची मी पर्वा करत नाही, असे कामत म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com