Goa Crime: ‘..तुम्हाला दाखवतोच’ असे म्हणत रागात गेला निघून; गोव्यात नुकत्याच आलेल्या अल्पवयीनाचा केला निर्घृण खून

Vithalapur Karapur Crime: विठ्ठलापूर-कारापूर येथील कामगाराला कामावरून काढून टाकल्याच्या रागातून त्याने कामगाराच्या १२ वर्षीय भावाचा दगडाने ठेचून निर्घृणपणे खून केला
Vithalapur Karapur Crime: विठ्ठलापूर-कारापूर येथील कामगाराला कामावरून काढून टाकल्याच्या रागातून त्याने कामगाराच्या १२ वर्षीय भावाचा दगडाने ठेचून निर्घृणपणे खून केला
Bicholim Police|Goa Karapur MurderDainik Gomantak
Published on
Updated on

Karapur Murder News

साखळी: विठ्ठलापूर-कारापूर येथील एका डेअरीमधील कामगाराला नेहमी भांडण करीत असल्याने कामावरून काढून टाकल्याच्या रागातून त्याने नव्याने कामावर घेतलेल्या कामगाराच्या १२ वर्षीय भावाचा दगडाने ठेचून निर्घृणपणे खून केला. खून केल्यानंतर संशयिताने डेअरी मालकाची दुचाकी घेऊन घटनास्थळावरून पळ काढला. त्याच्या शोधात डिचोली पोलिसांची पथके महाराष्ट्रात रवाना झाली आहेत.

कारापूर येथील डेअरीत कामाला असलेला वादग्रस्त कामगार चंदू पाटील (शेगाव- महाराष्ट्र) याला नोकरीवरून काढल्याने त्याने मालकाशी वाद घातला. तसेच अर्षद अली या कामगाराशीही भांडण केले. त्यामुळे डेअरी मालकाने चंदूला शनिवारपर्यंतचा पगार देऊन कामावरून काढून टाकले. या रागात चंदूने मालकाबरोबरच अर्षदलाही धमकी दिली होती. ‘मी गप्प बसणार नाही, तुम्हाला काय ते दाखवतोच’ असे म्हणत तो गेला होता.

पहाटे ४ च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. पहाटे खोलीतील एकाला जाग आली असता अर्शदचा भाऊ खोलीत नव्हता. त्यामुळे शोधाशोध सुरू झाली. त्यावेळी तो गोठ्याबाहेर रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला आढळला. त्याला लगेच चादरीत गुंडाळून साखळीतील सरकारी सामाजिक आरोग्य केंद्रात नेले. तेथील डॉक्टरांनी त्या मुलाला मृत घोषित केले.

मध्यरात्री गोठ्याबाहेर नेले अन्...

शनिवारी रात्री काम आटोपून अर्षद आपला १२ वर्षीय भाऊ तसेच अन्य एका कामगारासह डेअरीलगतच्या खोलीत झोपायला गेला. मध्यरात्री चंदू डेअरीकडे आला. त्याने खोली उघडून आत झोपलेल्या अर्शदच्या भावाला उचलून गोठ्याबाहेर दुसऱ्या बाजूला नेले. तेथे त्याच्या डोक्यावर दगडाने प्रहार केला.

डेअरीमालकाचीच दुचाकी घेऊन पसार

रात्री मुलाचा खून केल्यानंतर चंदू डेअरीमालकाचीच दुचाकी घेऊन पसार झाला. ही दुचाकी पोलिसांना थिवी रेल्वे स्थानकावर मिळाली. त्यानुसार चंदू रेल्वेतून दुसऱ्या राज्यात पसार झाल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या मोबाईलचे लोकेशन मिळवून शोध घेण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत.

काळाचा घाला

अर्षदचे आई-वडील कोरोनाच्या साथीमुळे मरण पावल्यानंतर घरात केवळ तीन भाऊ उरले होते. अर्षद गोव्यात कामासाठी आला होता. लहान भावाला घरात कोणी सांभाळायला नसल्याने आपल्यासोबत आणले होते. दोनच दिवसांत काळाने झडप घातली.

Vithalapur Karapur Crime: विठ्ठलापूर-कारापूर येथील कामगाराला कामावरून काढून टाकल्याच्या रागातून त्याने कामगाराच्या १२ वर्षीय भावाचा दगडाने ठेचून निर्घृणपणे खून केला
Mulgao Fire Incident: मुळगावात आगीमुळे चार दुचाकींची राखरांगोळी! दारूच्या नशेत कृत्य केल्याचा दाट संशय

पोलिस संशयिताच्या मागावर

या घटनेची माहिती सरकारी इस्पितळातून डिचोली पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या प्रकरणाची माहिती जाणून घेतली. तसेच संशयित चंदू पाटील याची माहिती डेअरीमालकाकडून मिळविली. त्याचे मोबाईल लोकेशन व इतर माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. मोबाईलचे लोकेशन कणकवलीपर्यंत मिळाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com