डिचोली: मुळगाव येथील एका गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी ठेवलेल्या दुचाकी जाळण्याचा प्रकार घडला असून, या घटनेत चार दुचाकी जळून भस्मसात झाल्या. या घटनेत दोन लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती गॅरेजमालकाने दिली. आग वेळीच नियंत्रणात आल्याने मोठा अनर्थ टळला.
या जाळपोळप्रकरणी एका स्थानिक संशयित युवकाला पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळाली आहे. मुळगाव-नानोडे बगलमार्गावरील शिवलकरवाडा-मुळगाव येथील दीपक आदक हा मॅकेनिक चालवत असलेल्या गॅरेजमध्ये ही घटना घडली. रात्री उशिरा साडेदहा ते पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचा अंदाज आहे. या घटनेची माहिती मिळताच, संबंधित गॅरेज मॅकनिकने घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी मोटारसायकल आणि स्कूटर मिळून चार दुचाकी पूर्णत: जळून गेल्या होत्या.
दीपक यांनी लागलीच पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेऊन संशयित युवक संकल्प मयेकर याला ताब्यात घेतले.
संशयिताने नेमक्या कोणत्या कारणासाठी गॅरेजमधील दुचाकी जाळल्या ते समजू शकले नाही. मात्र, या प्रकरणात अटक केलेल्या संशयित युवकाने दारूच्या नशेत हे कृत्य केल्याचा अंदाज आहे. डिचोली पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक दिनेश गडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विकेश हडफडकर यांनी या जाळपोळ प्रकरणाचा पंचनामा केला असून, ते पुढील तपास करीत आहेत.
अटक केलेला संशयित शिवलकरवाडा परिसरातील असून त्याचे नाव संकल्प मयेकर असे आहे. पार्टीला आमंत्रण दिले नाही. या रागातून त्याने हे कृत्य केले असावे, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. आपण काय ते तुला शिकवीन, अशी धमकी संकल्प याने आग लावण्यापूर्वी गॅरेज चालकाला दिली होती, अशी माहिती पुढे आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.