Crime News: फुटबॉल खेळताना मुलांच्या दोन गटांत वाद; अल्पवयीनावर कुत्रा सोडून दांडक्याने मारहाण, आरोपीला अटक

Minor Boy Dog Attack in Quepem: फुटबॉल खेळण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलावर कुत्रा सोडून त्याला चावा घेण्यास प्रवृत्त केल्याचा प्रकार भाट फुटबॉल मैदानाजवळ घडला.
Minor Boy Dog Attack in Quepem
Crime NewsDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

केपे: फुटबॉल खेळण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलावर कुत्रा सोडून त्याला चावा घेण्यास प्रवृत्त केल्याचा प्रकार भाट फुटबॉल मैदानाजवळ घडला. कुत्र्याने मुलाच्या दोन्ही पायांचा चावा घेतला, तर आरोपीने त्याला लाकडी दांडक्यानेही मारहाण केल्याचा आरोप आहे.

याप्रकरणी केपे पोलिसांनी किस्टोडिओ डायस (रा. मोवाती भाट, केपे) याला अटक केली आहे. माहितीनुसार, ३० ऑक्टोबर रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत मुलांच्या दोन गटांत वाद झाला.

Minor Boy Dog Attack in Quepem
Goa Horticulture Development: गोव्यात आंबा, नारळ, काजू अन् बांबूसाठी स्वतंत्र मंडळे! शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारचा नवा आराखडा

त्यावेळी किस्टोडिओ डायस हा कुत्र्यासह तेथे आला. त्याने शिवीगाळ करून मुलाला दांडक्याने मारहाण केली आणि कुत्रा त्याच्यावर सोडला. कुत्र्याच्या चाव्यामुळे मुलाचे दोन्ही पाय जखमी झाले. मित्रांनी बचावासाठी हस्तक्षेप केला असता त्यांनाही मारहाण करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.