विधानसभेत छातीठोकपणे सांगणाऱ्या मंत्र्यांनी गोवा माईल्सचा अधिकृत पत्ता द्यावा

सरकारने राज्यातील टॅक्सीचालकाना डिजिटल मीटरची सक्ती केली असूनज्यांनी ते बसवले नाहीत त्यांचा टॅक्सी परमिट परवाना रद्द करण्याची कारवाईही सुरू झाली आहे.
मंत्र्यांनी गोवा माईल्सचा अधिकृत पत्ता द्यावा
मंत्र्यांनी गोवा माईल्सचा अधिकृत पत्ता द्यावाDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यात सुरू असलेल्या गोवा माईल्समध्ये (Goa Miles) अनेक कथित भ्रष्टाचार झाला असल्याने त्याची चौकशी करण्यासाठी सुदीप ताम्हणकर (Sudip Tamhankar) यांनी लोकायुक्तकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवर प्राथमिक सुनावणी होऊन सरकारला (Goa Government) याप्रकरणी दोन महिन्यात चौकशी पूर्ण करणार का अशी विचारणा केली आहे नाहीतर लोकायुक्त ही सुनावणी सुरू करेल असे दिलेल्या आदेशात नमूद केले आहे अशी माहिती अखिल गोवा बस मालक संघटनेचे सरचिटणीस उल्लेख ताम्हणकर यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना दिली. (Ministers who boldly state in Assembly should give official address of Goa Miles)

मंत्र्यांनी गोवा माईल्सचा अधिकृत पत्ता द्यावा
Goa: महिलांच्या संरक्षणात गोवा सरकार अपयशी

दरम्यान या तक्रारीत गोवा माईल्सच्या फ्रोटो माईल्सला प्रतिवादी करण्यात आले आहे. लोकायुक्तने त्यांना नोटीस बजावली असून त्यांनी दिलेल्या पत्त्यावर त्यांचे कार्यालय नसल्याने ती परत आली आहे त्यामुळे गोवा माईल्स गोव्यात आपण आणली असे विधानसभेत छातीठोकपणे सांगणाऱ्या मंत्री बाबू आजगावकर यांनी आता गोवा माईल्सचा अधिकृत पत्ता द्यावा अशी मागणी सुदिप ताम्हणकर यांनी केली आहे.

मंत्र्यांनी गोवा माईल्सचा अधिकृत पत्ता द्यावा
Goa: बागायती पुन्हा कशा उभ्या कराव्यात ; बागायतदार उल्हास सालेलकरांची व्यथा

सरकारने राज्यातील टॅक्सीचालकाना डिजिटल मीटरची सक्ती केली असूनज्यांनी ते बसवले नाहीत त्यांचा टॅक्सी परमिट परवाना रद्द करण्याची कारवाईही सुरू झाली आहे. या डिजिटल मीटरच्या सक्तीविरुद्ध सुदीप ताम्हणकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका सादर केली असून ही सक्ती न करता याचिकादाराने सुचवलेला पर्याय देण्याचे निर्देश सरकारला द्यावेत ही विनंती त्यानी केली आहे. इतर राज्याप्रमाणे गोव्यातही डिजिटल ऍप सुरू करण्याची परवानगी द्यावी असे त्यात नमूद करण्यात आले आहे. टॅक्सींसाठी व्हेईकल ट्रेकिंग व पॅनिक बटण बसवण्यासाठी आठ कंपन्यांना काम देण्यात आले आहे तर डिजिटल मीटर बसण्याचे काम एकाच कंपनीला का देण्यात आले आहे असा सवाल त्यांनी याचिकेत केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com