Vishwajit Rane: येत्या पाच वर्षात युवकांना रोजगाराच्या अधिक संधी मिळतील

युवकांच्या रोजगाराबाबत मंत्री विश्वजीत राणे यांनी केलं भाष्य
Vishwajit Rane
Vishwajit RaneDainik Gomantak

गोवा राज्यात युवकांना अनेक प्रकारच्या रोजगार संधी उपलब्ध करुन देण्यासाठीच्या मुद्यावरुन सर्व स्तरावर चर्चा झाल्या आहेत. या मुद्यावरुन विरोधी पक्षांनी राज्य सरकारला बऱ्याचदा घेरण्याचा प्रयत्न ही केला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री विश्वजीत राणे यांनी पुन्हा एकदा भाष्यं केले असून, युवकांना नोकरीच्या संधी मिळायला हव्यात असे ही ते म्हणाले.

(Minister Vishwajit Rane said that youth will get more employment opportunities in the next five years)

Vishwajit Rane
होंडा येथे निकृष्ट कोळसा पुरवत सुक्राफ्ट कंपनीची 2 कोटीची फसवणूक

खेळाडूंना सराव अथवा खेळता यावा यासाठी सर्वोत्कृष्ट मैदान उपलब्ध करून देण्यात येणार असून त्याची सुरुवात गुळेलीपासून होणार असल्याचेही विश्वजीत राणे यांनी सांगितले. यावेळी बोलताना आरोग्य मंत्री विश्वजीत राणे म्हणाले की, सर्वांनी आपापसातले भेदभाव मिटवून एकत्र येण्याची गरज आहे. आपण सर्वांना बरोबर घेऊनच पुढे जाणार आहे.

युवकांसाठी सत्तरीतील प्रत्येक पंचायतक्षेत्रात जागा उपलब्ध असली तर त्याठिकाणी मैदान उभारण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. या साठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. गोव्यातील सरकार या पुढील पाच वर्षांत अनेक नवनवीन प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न करणार आहे त्यात युवकांचाही नोकरीचा प्रश्न सोडविण्यासाठी आपण सदैव तत्पर आहे. या पुढेही राहणार आहे. गावा एकजूट अशा प्रकारच्या कार्यक्रमातून लोकांनी दाखवली पाहिजे असे ते म्हणाले.

Vishwajit Rane
सोनाली फोगाट यांना जबरदस्तीने पेय पाजतानाचा व्हिडिओ व्हायरल

यावेळी गुळेली सरपंच नितेश गावडे म्हणाले की सत्तरीच्या विकासासाठी आरोग्य मंत्र्याचे प्रयत्न वाखाणण्याजोगे आहे त्यासाठी सर्वांनी त्यांच्या सोबत राहून सत्तरीची व गोमंतकाची सेवा करण्यासाठी त्यांचे हात बळकट करावे. गुळेलीचे माजी पंच अनिल गावडे यांच्या प्रयत्नातून साकार झालेल्या या प्रकल्पाविषयी बोलताना गावडे म्हणाले की, लोकांचा गणपती विसर्जन स्थळाचा प्रश्न गुळेलीतील सावंत बंधूनी उपलब्ध करून दिलेल्या जमिनीमुळे सुटला यासाठी सर्वांच्या तीने आपण त्यांचे आभार मानतो.अशा प्रकारच्या प्रकल्पासाठी विश्वजीत राणे यांचे नेहमी सहकार्य असते त्यांसाठी त्यांचे आभार व्यक्त केले.

सर्वप्रथम आरोग्य मंत्र्याच्या हस्ते फलकाचे अनावरण करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेमानंद नाईक यांनी केले तर आभार गुळेली पंच अक्षिता अनिल गावडे यांनी मानले.या कार्यक्रमाला गुळेली पंचायत क्षेत्रातील माजी पंच तसेच युवा व महिलावर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.

यावेळी समाजसेवक विनोद शिंदे, गुळेली ग्रामपंचायतीचे सरपंच नितेश गावडे, उपसरपंच रत्नाकर कासकर पंच अक्षिता अनिल गावडे,मैंगिणे पंच प्रशांती मेळेकर,धामसे पंच ज्योती गावकर, माजी पंच अनिल गावडे,गुळेलीतील सावंत बंधू यशवंत बाबलो सावंत, विश्वराज रामनाथ सावंत, विजयसिंग रामनाथ सावंत ,माजी पंच विनोद गावकर,अस्मिता मेळेकर,अपूर्वा च्यारी,विठ्ठल कासकर ,कंत्राटदार सुखानंद बर्वे, उसगाव गांजे सरपंच नरेंद्र गावकर,माजी जिल्हा पंचायत सदस्य प्रेमनाथ हजारे व इतर माजी पंच उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com