होंडा येथे निकृष्ट कोळसा पुरवत सुक्राफ्ट कंपनीची 2 कोटीची फसवणूक

होंडा येथील कंपनी कर्मचाऱ्यावर वाळपई पोलिसात गुन्हा नोंद
Fraud of Rs 5 crore
Fraud of Rs 5 croreDainik Gomantak
Published on
Updated on

वाळपई: होंडा येथील सुक्राफ्ट लिमिटेड कंपनीच्या कंत्राटदारांकडून निकृष्ट दर्जाचा कोळसा पुरविल्यामुळे दोन कोटी रुपयांचा फटका बसलेला आहे. या कामी गुंतलेल्या एका कर्मचाऱ्यावर वाळपई पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आलेली आहे. (Substandard coal fraud of 2 crore at Sukraft company Honda )

याबाबतची माहिती अशी की, होंडा औद्योगिक वसाहतीमध्ये कार्यरत असलेल्या कंपनीला कागद निर्मितीसाठी कोळशाची गरज असते. हा कोळसा कंपनी बाहेरून आयात करते. यात कोळसा पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचा कोळसा पुरवल्याचे उघडकीस आले आहे. कोळशाची तपासणी करणारा कर्मचारी यामध्ये गुंतला होता. त्यामुळे कंपनीला गेल्या दोन महिन्यापासून जवळपास दोन कोटी रुपयांना फटका बसल्याचे उघडकीस आले आहे.

एक महिन्यापूर्वी संबधित कर्मचाऱ्यांच्या एकूण वागणूक संशयास्पद होती. त्यामुळे कंपनीच्या व्यवस्थापनाने त्याच्यावर पाळत ठेवली होती. दोन दिवसांपूर्वी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर रितसर तक्रार वाळपई पोलीस ठाण्याखावर दाखल करण्यात आली व या व्यक्तीवर गुन्हा नोंदवण्यात आला असून त्याला अटक करण्यात आलेली आहे.

आज दिवसभर कंपनीच्या परिसरामध्ये चौकशी करण्याची प्रक्रिया सुरू होती. कंपनी व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, कर्मचाऱ्याच्या संशयास्पद वर्तवणूकीने कंपनीला मोठा फटका बसला आहे. कोळसा पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचा कोळसा पुरविला.

कर्मचाऱ्यांनी त्याला मदत केल्यामुळे कंपनीला फटका बसल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. या संदर्भातील तक्रार वाळपई पोलिस स्थानकात दाखल करण्यात आल्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली असून या संदर्भात अधिक चौकशी सुरू असल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com