महाराष्ट्रातून गोव्यात येऊन धुमाकूळ घातलेल्या हत्तीचं आता कर्नाटकात पुनर्वसन करण्यासाठी हालचाली; राणेंनी घेतली कन्नड वन मंत्र्याची भेट

Omkar elephant Update: महाराष्ट्रातून गोव्यात येऊन धुमाकूळ घालणाऱ्या ‘ओंकार’ हत्तीला कर्नाटकमध्ये पुनर्वसन करण्यासाठी आता हालचाली सुरू झाल्या आहेत.
Omkar elephant Update
Omkar elephant UpdateDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: महाराष्ट्रातून गोव्यात येऊन धुमाकूळ घालणाऱ्या ‘ओंकार’ हत्तीला कर्नाटकमध्ये पुनर्वसन करण्यासाठी आता हालचाली सुरू झाल्या आहेत. मंत्री विश्वजित राणे यांनी शनिवारी (२० सप्टेंबर) कर्नाटकचे वनमंत्री ईश्वर खांद्रे यांची भेट घेऊन या ‘ओंकार’ हत्तीच्या पुनर्वसनाबाबत चर्चा केली.

बैठकीत मंत्री राणे यांनी ‘ओंकार’ हत्तीला लवकरात लवकर सुरक्षित आणि योग्य ठिकाणी पुनर्वसन करण्यासाठी त्वरित पावले उचलण्याची मागणी केली. या संदर्भात तीन राज्यांमधील (गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक) सहकार्याची गरज असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. १४ दिवसांच्या आत ‘ओंकार’ हत्तीचं कर्नाटकमध्ये पुनर्वसन करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याची मागणी त्यांनी केलीय.

Omkar elephant Update
Goa Tourism: 400 वर्षे जुनी, दुर्लक्षित, आदिलशाही काळातील 'ही' मशीद पाहिली का?

राज्यातील आणि सीमावर्ती भागातील नागरिकांमध्ये दहशत पसरवणाऱ्या हत्तीला नियंत्रणात आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. ‘ओंकार’ हा हत्ती मूळ कळपापासून विभक्त होऊन गोवा-महाराष्ट्राच्या सीमेजवळील भागात वारंवार हेलपाटे मारत आहे.

शेतकरी आणि स्थानिक नागरिक या हत्तीच्या धुमाकुळामुळे चिंतेत आहेत. विशेषतः बागायती शेती आणि केळीच्या बागांना मोठा तडाखा बसला असून, अनेक शेतकऱ्यांचे उत्पादन पूर्णपणे नाश पावल्याचे अहवाल आहेत. स्थानिक लोकांनी प्रशासनाकडे त्वरित उपाय योजण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

Omkar elephant Update
Goa Crime: मोबाईल फोडला, कामाच्या ठिकाणी जाऊन केला चाकूहल्ला; कळंगुट येथे परप्रांतीय तरुणांत वाद, पोलिसांत तक्रार दाखल

मंत्री राणे यांनी बैठकीत या प्रकरणावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली असून, त्रिपक्षीय सहकार्यातून हत्तीच्या नियंत्रणासाठी प्रभावी रणनीती राबवण्यावर भर दिला आहे. प्रशासनाकडूनही हत्तीच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवून नागरिकांचे संरक्षण करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com