Akshata Chhatre
गोव्यातील ग्रामीण भागाचा अनुभव घेण्यासाठी बाहेर पडला असाल, तर मांडवी नदीच्या किनाऱ्यावरील सुर्ला-तार मशीद या ऐतिहासिक मशिदीला नक्की भेट द्या.
हिरवागार निसर्ग आणि नयनरम्य परिसराने वेढलेली ही मशीद, गोव्याच्या समृद्ध सांस्कृतिक आणि धार्मिक इतिहासाची साक्ष देते.
सोळाव्या शतकात आदिलशाही काळात ही मशीद बांधली गेल्याचे सांगितले जाते.
तिच्या रचनेत पारंपरिक इस्लामिक स्थापत्यकलेची झलक दिसते.
सावईवेरे
या मशिदीपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला मांडवी नदी फेरीने पार करावी लागेल, ही मशीद सावईवेरे या गावात आहे.
पणजी शहरापासून हे ठिकाण २७ किमी आणि डिचोली शहरापासून १७ किमी अंतरावर आहे.
या भेटीदरम्यान तुम्ही गोव्याच्या शांत आणि ऐतिहासिक बाजूचा अनुभव घेऊ शकता.