Goa Police: अखेर राज्यातील '10' पोलिस अधीक्षकांना कार्यभार!

Goa Police: गोवा पोलिस कायदा व दक्षता विभागाचे अधीक्षक सिल्वा यांची वाहतूक पोलिस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.
Goa police
Goa policeDainik Gomantak 

Goa Police: बढती मिळूनही दोन महिने उलटत आले तरी कार्यभारच्या प्रतिक्षेत असलेल्या दहा पोलिस अधीक्षकांना काल कार्यभारचा आदेश काढण्यात आला. गोवा पोलिस खात्यातील कायदा व दक्षता विभागाचे अधीक्षक बोसुएट सिल्वा यांची वाहतूक पोलिस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.

अधीक्षक सुनिता सावंत यांच्याकडे आर्थिक गुन्हे तसेच कायदा व दक्षता विभागाचा ताबा देण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक मारिया मोन्सेरात यांच्याकडे पोलिस बिनतारी संदेश विभाग याव्यतिरिक्त राज्य पोलिस गुन्हे नोंदणी विभागाचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे.

Goa police
Goa News: शिरगाव परिसरातील वस्ती अन् देवस्थानचे अस्तित्व धोक्यात!

अधीक्षक गुरुदास गावडे यांच्याकडे कोकण रेल्वे, अधीक्षक एडविन कुलासो यांच्याकडे दहशतवादी विरोधी पथक, अधीक्षक नेल्सन अल्बुकर्क यांच्याकडे पोलिस प्रशिक्षण केंद्र, अधीक्षक सुचेता देसाई यांच्याकडे पोलिस प्रशिक्षण विभाग, अधीक्षक एजिल्डा डिसोझा यांच्याकडे डेप्युटी कमांडंट गृहरक्षक, अधीक्षक राजेंद्र राऊत देसाई यांच्याकडे अंमलीपदार्थविरोधी कक्ष व क्राईम ब्रँचच्या अतिरिक्त अधीक्षकपदाचा ताबा, अधक्षक धर्मेश आंगले यांच्याकडे विशेष शाखा तसेच अधीक्षक किरण पौडवाल यांच्याकडे सुरक्षा व किनारपट्टी सुरक्षा विभागाचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे.

बढती देण्यात आलेल्या अधीक्षकांना देण्यात आलेल्या कार्यभारामुळे पोलिस अधीक्षक शेखर प्रभुदेसाई तसेच उत्तर गोवा पोलिस अधीक्षक शोबित सक्सेना यांच्याकडे असलेल्या अनेक विभागांचा असलेला कार्यभार कमी झाला आहे.

Goa police
Goa News: 'माध्यान्ह'ची समस्या न सुटल्यास बेमुदत उपोषण

बदलीबाबत चर्चा

अधीक्षक बोसुएट सिल्वा हे खात्यातील कायदा व दक्षता विभागाचे काम पाहत होते, मात्र त्यांच्या बदलीबाबत पोलिस वर्तुळामध्येच चर्चा सुरू आहे. पोलिस खात्यातील अनेक गैरप्रकाराबाबत कारवाई करण्याच्या शिफारशी पोलिस महासंचालकांना अधीक्षक सिल्वा यांनी केलेल्या आहेत. चौकशीमध्ये फेरबदल करण्यास ते राजी होत नसल्याने अखेर त्यांना हटवण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com