पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी नुकतीच GTDCचे अध्यक्ष गणेश गावकर यांच्यासह फार्मगुडी येथील इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड कलिनरी स्किल्स (IHM) च्या सुरू असलेल्या कामाची पाहणी केली.
मंत्र्यांनी डब्ल्यूआरडीचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी आणि सल्लागार रविशंकर यांच्यासोबत कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला.
त्यांच्या भेटीदरम्यान, मंत्री रोहन खंवटे म्हणाले की, "पर्यटन क्षेत्र गोव्यासाठी 35% रोजगार निर्माण करते. यामध्ये हॉटेल व्यवसायाला महत्वाचे स्थान आहे. त्यामुळे हॉटेल उद्योगातील कौशल्ये सुधारणे आवश्यक आहे."
ही हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट 320 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार असून विद्यार्थ्यांची संख्या 500 पर्यंत वाढू शकते, असे सांगून त्यांनी प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला आणि संस्थेचे बांधकाम चार महिन्यांत पूर्ण केले जाईल, असे आश्वासन दिले. या दौऱ्यात सरकारी अधिकारी आणि सल्लागारही त्यांच्यासोबत होते.
दरम्यान, केपे तालुक्यातील किटला (Quitol) येथे ओशनॅरियम (सागरी मत्स्यालय) सुरू करणार असल्याची माहिती पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी दिली. स्थानिकांसह पर्यटकांसाठी हे आकर्षणाचे केंद्र ठरेल. या प्रकल्पासाठी 800 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च अपेक्षित आहे, असेही खंवटे यांनी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.