Ponda News: फोंड्यात क्रियाशील पालिका मंडळाची गरज : मंत्री रवी नाईक

वर्षभरात विविध विकासकामांना गती
Agriculture Minister Ravi Naik
Agriculture Minister Ravi NaikDainik Gomantak

Agriculture Minister Ravi Naik: फोंडा नगरपालिकेची निवडणूक आता जवळ येऊ लागल्यामुळे शहरातील राजकारण तप्त व्हायला लागले आहे. विद्यमान नगरपालिका मंडळ 22 मे 2018 रोजी सत्तारूढ झाले होते. त्यामुळे या 22 मे पूर्वी नगरपालिका निवडणुका होणे, गरजेचे आहे.

या पाच वर्षात रवी नाईक हेच आमदार होते. सुरुवातीची चार वर्षे ते काँग्रेसचे आमदार होते. तर गेले एक वर्ष ते भाजपचे आमदार म्हणून कार्यरत आहेत. विद्यमान मंडळाच्या गेल्या पाच वर्षातील प्रगती पुस्तकाबाबत त्यांनी ‘गोमन्तक’शी केलेली ही बातचीत.

Agriculture Minister Ravi Naik
Govind Gaude : गोव्याला ‘आऊटस्टेशन’ खेळाडूंचा ‘बूस्टर’ शक्य; क्रीडामंत्र्यांचा अप्रत्यक्ष दुजोरा

विद्यमान नगरपालिका मंडळाबाबत समाधानी आहात का?

विशेष नाही. सुरुवातीची चार वर्षे विशेष असे कार्य झाले नाही. काही निर्णय चुकीचे घेतले गेले. गरज नसताना कंत्राट पद्धतीवर नोकर भरती करणे, हा असाच एक चुकीचा निर्णय. त्यांना पगार द्यायला आज नगरपालिकेकडे निधी नाही.

मात्र गेले एकवर्ष म्हणजे रितेशने नगराध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर कार्याला बरीच गती प्राप्त झाली आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही. फोंडा बाजारात शेडची आवश्यकता होती. गेल्या कित्येक वर्षापासून लोकांची तशी मागणी होती. आता या शेडमुळे बाजारात येणाऱ्या विक्रेत्यांची योग्य व्यवस्था झाली आहे.

पाऊस-उन्हापासून त्यांचे आता संरक्षण होत आहे. मार्केटची एक प्रकारची पुनर्रचनाच झाली आहे. आता मासळी व भाजीच्या मार्केटला आधुनिक स्वरूप देण्यात येणार आहे. त्याशिवाय फोंडा शहराचा ‘मास्टर प्लॅन’ तयार करण्यात आला असून तो जनतेच्या सूचनांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. वारखंडे येथे असलेल्या नगरपालिकेच्या स्मशान भूमीला नवीन साज चढवण्यात येत आहे.

Agriculture Minister Ravi Naik
Illegal Construction : अवैध बांधकामांवर कारवाई; सरकारचा आदेश

‘त्या’ सुवर्ण महोत्सवी इमारतीबाबत काय?

मी गृहमंत्री असताना या प्रकल्पाचा शिलान्यास करण्यात आला होता. त्यानंतर २०१२ साली माझा पराभव झाल्यानंतर तो प्रकल्प कुर्मगतीने सुरू आहे. तेव्हाच्या नगरपालिका मंडळाने या प्रकल्पाची अक्षरशः हेळसांड केली. त्यामुळे त्यात काही तांत्रिक अडचणीही उद्‍भवल्या.

विद्यमान नगरपालिका मंडळाचेही या प्रकल्पाकडे दुर्लक्ष झाले, हेही नाकारता येत नाही. पण आता नगराध्यक्ष रितेशने यात लक्ष घातले असून त्या तांत्रिक अडचणी दूर करण्याच्या प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे.

गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली त्याबद्दल....

क्रांती मैदान म्हणजे फोंड्याची शान. 1992 साली म्हणजे मी मुख्यमंत्री असताना या क्रांती मैदानाचा अर्धा भाग लष्कराच्या ताब्यातून सोडवला होता.

उर्वरित भाग फोंडा पालिकेकडे हस्तांतर करण्यासंदर्भात मी व नगराध्यक्ष रितेश यांनी नुकतीच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन याबाबत त्यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे लवकरच क्रांती मैदानाचा उर्वरित भागही पालिकेकडे येण्याची शक्यता वाढली आहे.

बाजारातील दुकानांचा लवकरच लिलाव

तिथे असलेला ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित नसल्यामुळे वीजपुरवठा होत नाही. आता याबाबतीतही नगराध्यक्षांनी पुढाकार घेतला असून येत्या काही दिवसात तिथे वीजपुरवठा सुरू होणार असून तिथल्या दुकानांचा लिलाव केला जाणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com