Goa AAP Campaign: आम आदमी पक्ष राज्‍यात राबवणार ‘मोदी हटाव-देश बचाव’ अभियान

गोव्यात ‘मोदी हटाव, देश बचाव’ अभियान राबविण्‍यात येणार असल्याची माहिती ‘आप’तर्फे देण्यात आली.
आम आदमी पार्टी
आम आदमी पार्टी Gomantak Digital Team

Goa AAP Campaign: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात दिल्लीत पोस्टर्स लावल्यावरून आम आदमी पक्षाच्या अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भाजपची ही हुकूमशाही असून, विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे.

त्यामुळे गोव्यात ‘मोदी हटाव, देश बचाव’ अभियान राबविण्‍यात येणार असल्याची माहिती ‘आप’तर्फे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.

‘आप’चे प्रदेशाध्यक्ष ॲड. अमित पालेकर म्हणाले की, देशातील सरकार हे हिटलरपेक्षा वाईट आहे. गोवा राज्‍य विधानसभेत बुधवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पातून नागरिकांना लॉलीपॉप दाखविले आहेत. गेल्या अर्थसंकल्पातील ६५ टक्के घोषणा अपूर्ण आहेत. त्याच घोषणा यंदा पुन्हा करण्‍यात आल्‍या आहेत.

राज्यातील कुठल्याही मध्यमवर्गीय व्यक्तीला तू सुखी आहे का? असे विचारा. गॅस सिलिंडरच्या दरात झालेली वाढ पाहिल्यास ते कळून येईल. महागाई प्रचंड वाढली आहे. सर्वसामान्यांनी जगायचे कसे? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. राज्य सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पामुळे कुणाला आनंद झाला आहे? असे सवाल त्‍यांनी उपस्‍थित केले.

आम आदमी पार्टी
Modi Government Scheme: मोदी सरकार महिलांना देतेय 52,000 रुपये! मोठा खुलासा झाला

गोमंतकीयांनी सहकार्य करावे : वाल्मिकी

देशभरात मोदी सरकारविरोधात कोणी बोलू शकत नाही अशी परिस्थिती आहे. लोकांनी हे लक्षात ठेवावे, मोदी जोपर्यंत पंतप्रधान आहेत तोपर्यंत देशाचे भले होणार नाही. मोदींना हटविले तरच देश वाचणार आहे.

मोदी यांच्याविरोधात पोस्टर लावल्यावरून राजधानी दिल्लीत १३८ तक्रारी दाखल झाल्या आहेत. विरोधकांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे.

त्यामुळे आता आम्ही राज्यात ‘मोदी हटाओ, देश बचाव'' अशी पोस्टर मोहीम राबवत आहोत. आम्ही सर्व गोवेकरांनाही आवाहन करत आहोत की, स्वातंत्र्यसैनिकांनी ज्यासाठी बलिदान दिले, त्या लोकशाहीला वाचविण्यासाठी तुम्‍ही आमच्या या मोहिमेत आम्हाला सहकार्य करावे, असे वाल्मिकी नाईक म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com