CM Pramod Sawant in Hello Goenkar Programme: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाच्या धर्तीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हॅलो गोयंकार हा फोन इन कार्यक्रम सुरू केला आहे.
गोवा दुरदर्शनवर हा कार्यक्रम महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी सायंकाळी सात ते आठ या वेळेत होतो. आज, 7 जुलै रोजी मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधला.
आजच्या हॅलो गोयंकार कार्यक्रमात बोलताना राज्यातील गुन्हेगारीबाबत प्रश्न उपस्थित झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी गुन्हे उघडकीस आणण्याच्या बाबतीत गोवा हे देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य असल्याचे सांगितले.
ते म्हणाले की, राज्यात गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण देशात सर्वाधिक आहे. हे प्रमाण 98 टक्के इतके आहे. गोवा पोलिसांचे हे यश आहे. गुन्हेगारी कमी करण्याच्या अनुषंगाने विविध उपाय राबवले जात आहेत. भाडेकरूंच्या पडताळणीसह विविध उपाययोजना केल्या जात आहेत.
दरम्यान, बेरोजगारीबाबत बोलताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, सर्वांनीच सरकारी नोकरीच्या मागे लागण्याची गरज नाही. सरकारने आणलेल्या अॅप्रेंटिसशिप योजनेत युवकांनी नोंदणी करावी.
सरकारने अॅप्रेंटिसशिप अंतर्गत दहा हजार जणांना संधी देण्याचे ठरवले आहे पण त्यातील निम्म्या म्हणजे जवळपास 5 हजार जागा रिक्त आहेत. युवकांनी सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत राहावे. पण त्यापुर्वी अॅप्रेंटिसशिपसाठी अर्ज करावा. प्रशिक्षण घ्यावे. ते त्यांना उपयोगीच पडणार आहे.
दरम्यान, नागरिकांनी फोनवरून विचारलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी मनमोकळी उत्तरे दिली. ज्यांनी आपल्या समस्या मांडल्या त्यांना मुख्यमंत्र्यांनी नेमकेपणाने मार्गदर्शन केले. एखाद्या खात्यातील कुठल्या अधिकाऱ्यााला भेटून संबंधित प्रश्न मार्गी लावता येईल, याबाबत त्यांनी नेमकेपणाने उत्तरे दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.