Zuari Bridge: झुआरी पुलाची लोड टेस्टिंग पुर्ण; खुला करण्याबाबत वाहतूक मंत्री काब्राल म्हणाले..

झुआरी पुल दक्षिण गोव्यातील वाहतुकीसाठी महत्वाचा
Zuari Bridge
Zuari BridgeDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: राज्यातील महत्त्वाकांक्षी अशा झुआरी पुलाच्या एका बाजूचे काम आता पूर्ण झाले असून आणि हा पूल वाहतुकीस लवकरात लवकर खुला करण्यासाठी पुलावरील लोड टेस्टिंगचे काम आज बुधवारी झाले. याची पाहणी सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांनी केली. (Minister Nilesh Cabral informed Zuari Bridge will be opened as soon)

याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांच्यासह सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी, वाहतूक पोलिस अधीक्षक व इतर संबंधीत अधिकारी उपस्थित होते. या लोड चाचणीच्या वेळी 32 टनाचा एक ट्रक असे एका रांगेत 4 ट्रक मिळून जकूण 32 ट्रक या केबल पुलावर बुधवारी दुपारपासून 24 तास ठेवण्यात येणार आहेत.

पाहणी वेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांनी सांगितले की, नवीन झुआरी पुलावरील वाहतुकीच्या हालचालीसाठी तात्पुरत्या योजनेत वर्षाच्या अखेरीस वाहतुक करण्यासाठी 15 दिवसांच्या चाचणीचा समावेश आहे. सध्याचा जुना झुआरी पूल उत्तर गोव्याकडून दक्षिण गोव्याकडे वाहतूक करण्यासाठी पूर्णपणे समर्पित असेल आणि नवीन झुआरी पुलाचा उपयोग अवजड वाहनांशिवाय दक्षिण गोव्याकडून उत्तर गोव्याकडे वाहतूकीसाठी केला जाईल.असे म्हटले आहे.

Zuari Bridge
Goa Crime Cases: गोव्यात वाढली गुंडगिरी, पोलिसांचा धाक संपला का?

काब्राल यांनी पुढे सांगितले की त्यांच्याद्वारे एका फाईलवर स्वाक्षरी केली जाईल ज्यामध्ये प्राइम ट्रॅफिक जंक्शन्सवर हाय-टेक ट्रॅफिक आयलंड स्थापित करण्याचा प्रस्ताव ठेवला जाईल. वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि उल्लंघन करणाऱ्यांवर दंड आकारण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग केला जाईल तसेच पूल सुरक्षित असेल तेव्हाच पूर्ण क्षमतेने खुला केला जाईल असे म्हटले आहे.

Zuari Bridge
Lusophone Festival in Goa: गोव्यात होणारा आंतरराष्ट्रीय लुसोफोन महोत्सव काय आहे? जाणून घ्या ऐतिहासिक संबंध

झुआरी पुल दक्षिण गोव्यातील वाहतुकीसाठी महत्वाचा भाग मानल जातो. राष्ट्रीय महामार्ग 17 वरील झुआरी पूल कमकुवत आणि धोकादायक बनल्याने सरकारने नवीन पुल बांधण्याचा निर्णय घेतला. 11 डिसेंबर रोजी गोवा दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन पुलाचे उद्घाटन अपेक्षीत आहे. त्यानंतर तो वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला केला जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com