Margao: वेस्टर्न बायपास रस्त्यामुळे पर्यावरण हानी होणार? मंत्री काब्राल यांचा मोठा खुलासा

वेस्टर्न बायपासचे काम उच्च न्यायालयाच्या निगराणीखालीच चालू - मंत्री काब्राल
Nilesh Cabral
Nilesh Cabral Dainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव : वेस्टर्न बायपास रस्त्याचे काम उच्च न्यायालयाच्या आणि राष्ट्रीय हरीत लवादाच्या निगराणीखाली चालू आहे. त्यामुळे या रस्त्यामुळे पर्यावरणाची हानी होणार. याची भिती कुणी ही बाळगू नये असे पर्यावरण मंत्री निलेश काब्राल यांनी माहिती दिली. या रस्त्याचा आराखडा येत्या आठवड्यात लोकांना उपलब्ध करून देण्यात येईल असे ही ते म्हणाले.

(Minister Nilesh Cabral informed that there will be no environmental damage due to the Western Bypass Road)

Nilesh Cabral
INS Mormugao : आयएनएस मुरगाव देशाची किनारपट्टी अधिक सुरक्षित

आज काब्राल हे मडगाव येथे एका कार्यक्रमास आले असता पत्रकारांनी त्यांना या रस्त्याबद्दल विचारले असता त्यांनी हे उत्तर दिले. हा रस्ता बांधण्यासाठी मातीचे भराव घालू लागल्यामुळे हा रस्ता स्टील्टवर न बांधता मातीचा भराव घालून बांधण्यात येईल अशी लोकांमध्ये भीती आहे.

Nilesh Cabral
Dabolim Airport : दाबोळी विमानतळाचं भवितव्य काय? वाहतूक मंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

या पार्श्वभूमीवर त्यांनी हा खुलासा केला. यातील 2.5 किलोमीटर रस्ता स्टिल्टवर बांधला जाईल. उरलेला रस्ता जरी मातीचा भराव घालून बांधण्यात येत असला तरी पाण्याचा प्रवाह अडून राहू नये यासाठी बऱ्याच वाटा मोकळ्या ठेवण्यात आल्या आहेत.

पुर्वी या रस्त्यासाठी तीनच पाण्यासाठी वाटा ठेवल्या होत्या मात्र आता त्यांची संख्या वाढवून 13 करण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. मडगाव आणि नावेली येथे सांडपाणी वाहिनीच्या दुरुस्तीचे काम आहे ते मे महिन्यापर्यंत पूर्ण होणार आणि जानेवारी महिन्याच्या मध्यास त्याचे काम सुरू होणार अशी माहिती त्यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com