INS Mormugao : आयएनएस मुरगाव देशाची किनारपट्टी अधिक सुरक्षित

नौदलाच्या ताफ्यात क्षेपणास्त्रसज्ज विनाशिका दाखल
INS Mormugao
INS MormugaoDainik Gomantak
Published on
Updated on

प्रोजेक्ट 15-बी युद्धनौका बांधणी प्रकल्पातील सर्वांत अत्याधुनिक क्षेपणास्त्रक्षम विनाशिका ‘आयएनएस मुरगाव’ हिला नौदल गोदीतील विशेष समारंभात नौदल ताफ्यात दाखल करून घेण्यात आले. यामुळे देशाची किनारपट्टी अधिक सुरक्षित होणार आहे. मुंबई येथे पार पडलेल्या या सभारंभाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, नौदलप्रमुख ॲडमिरल आर. हरिकुमार, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान, गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

ही विनाशिका ‘विशाखापट्टण’ वर्गातील दुसरी विनाशिका आहे. या विनाशिकेची रचना नौदलाच्या वॉरशिप डिझाईन ब्युरोने केले असून ती माझगाव डॉकमध्ये तयार करण्यात आली. या युद्धनौकेच्या सागरी चाचण्या गोवा मुक्तिदिनाच्या 60 व्या वर्धापनदिनी म्हणजे मागील वर्षी 19 डिसेंबर रोजी सुरू झाल्या होत्या. युद्धनौकेवर अत्याधुनिक शस्त्रे व शत्रूची लक्ष्ये हुडकण्यासाठी सेन्सर बसविण्यात आले आहेत. यात पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारी क्षेपणास्त्रे; तसेच पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी (शत्रूची विमाने व क्षेपणास्त्रे हवेत नष्ट करण्यासाठी) क्षेपणास्त्रे तसेच शत्रूच्या पाणबुड्या नष्ट करण्यासाठी रॉकेट आणि टॉर्पेडो आहेत. शत्रूच्या पाणबुड्या शोधण्यासाठी युद्धनौकेवर हेलिकॉप्टरदेखील आहेत. वेगवेगळ्या प्रकारची लांब पल्ल्याची टेहळणी रडारही तैनात करण्यात आले आहे. जैविक, रासायनिक व अण्विक युद्धातही ही विनाशिका तग धरून राहू शकेल, अशी तिची रचना आहे.

INS Mormugao
IIT Goa : आयआयटीवरून उगेवासीय संभ्रमात, धाकधूक वाढली!

तीन चतुर्थांश भाग स्वदेशी

‘आयएनएस मुरगाव’ 75 टक्के भाग स्वदेशी निर्मित आहे. क्षेपणास्त्रे, टॉर्पेडो ट्यूब व लाँचर, पाणबुडीविरोधी रॉकेट लाँचर, शत्रूच्या विमानांवर वेगाने मारा करणाऱ्या गन, युद्धप्रणाली, पॉवर मॅनेजमेंट सिस्टिम, प्लॅटफॉर्म मॅनेजमेंट सिस्टिम, सोनार व अन्य शस्त्रे स्वदेशी बनावटीची आहेत. या विनाशिकेवरील अत्याधुनिक यंत्रणेमुळे ती शत्रूच्या रडारवर दिसत नाही.

गोवा मुक्ती संग्रामाला सलामी

मुरगाव हे गोवा मुक्ती संघर्षाचे महत्त्वाचे केंद्र होते. याच कारणामुळे नव्या विनाशिकेला मुरगाव हे नाव देऊन नौदलाच्या माध्यमातूम गोव्यात लोकशाहीसाठी झालेल्या लढ्याला सलामी देण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com