Mahadayi Water Dispute: ...तर गोव्यातील 25 हजार कोटींची उलाढाल ठप्प; मंत्री मॉविन गुदिन्हो यांचा इशारा

कर्नाटकचे नेते निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन वक्तव्ये करत असल्याचा आरोप
Transport Minister Mauvin Godinho
Transport Minister Mauvin Godinho Dainik Gomantak
Published on
Updated on

Mahadayi Water Dispute: म्हादई नदीचा प्रवाह वाहता राहिला नाही तर गोव्यातील अन्न प्रक्रिया उद्योगातील सुमारे 25 हजार कोटींची उलाढाल ठप्प होईल, असा भयसूचक इशारा गोव्याचे वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी दिला आहे.

दरम्यान, भविष्यातील युद्धे ही पाण्यासाठी लढली जातील, आणि म्हादई त्याची सुरवात आहे, असेही ते म्हणाले.

Transport Minister Mauvin Godinho
Goa Fraud Case: उत्तर प्रदेशच्या कंपनीचा गोव्यातील 1000 गुंतवणुकदारांना गंडा; सुमारे 10 कोटी लुबाडले

मंत्री मॉविन गुदिन्हो म्हणाले की, भविष्यातील युद्धे ही पाण्यासाठी लढली जातील, आणि म्हादई त्याची सुरवात आहे. म्हादई नदी गोव्याच्या कृषी आणि उद्योग क्षेत्रासाठी अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आम्ही गोव्याच्या हितासाठी, म्हादई नदीसाठी लढत राहू.

गोव्यात जवळपास 61 अन्न प्रक्रिया उद्योग आहेत. या उद्योगाची वार्षिक उलाढाल सुमारे 25 हजार कोटी रूपये इतकी आहे. पण जर, म्हादई वाहती राहिली नाही तर या उद्योगांचे नुकसान होईल. गोव्याला सोन्याची भूमी म्हटले जाते. पण म्हादई वाहते म्हणून गोव्याची भूमी सोन्याची आहे. म्हादई नसेल तर गोव्याची भुमी सोन्याची राहणार नाही तर कोरडी होईल.

कर्नाटकात सध्या इलेक्शन मोड ऑन झाला आहे. तेथे लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. आणि त्यामुळेच तेथील राजकीय नेते म्हादईबाबत विविध वक्तव्ये करत आहेत. पण ही वक्तव्ये शुद्ध राजकीय आहेत. राजकारणासाठी आणि आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी ही वक्तव्ये केली जात आहेत, असेही गुदिन्हो म्हणाले.

Transport Minister Mauvin Godinho
Canacona: बोटींच्या मोटर चोरणाऱ्या चौघांना कोलवा येथे अटक

केंद्रीय जल आयोगाने म्हादई नदीवरील प्रकल्पांबाबत कर्नाटकच्या सुधारीत डीपीआरला मंजुरी दिल्यानंतरपासून गोव्यात याविरोधात जनक्षोभ उसळला आहे. याबाबत गोव्याच्या मंत्रीमंडळ शिष्टमंडळाने केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांचीही भेट घेतली आहे.

तसेच म्हादई वाचविण्यासाठी जनआंदोलन उभे राहिले आहे. दरम्यान, त्यातच आता वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी आता म्हादई नदीमुळे लाभ होणाऱ्या गोव्यातील अन्न प्रक्रिया उद्योगासमोर काय अडचणी येऊ शकतील याची शक्यता मांडली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com