Canacona: बोटींच्या मोटर चोरणाऱ्या चौघांना कोलवा येथे अटक

मोटरसह गुन्ह्यात वापरलेली चारचाकी जप्त, काणकोणमध्ये केली होती चोरी
Canacona Boat Motor Thief
Canacona Boat Motor Thief Dainik Gomantak

Canacona Boat Motor Thief Arrested: समुद्रातील मच्छिमारी, गस्तीच्या नौकांच्या (बोटींच्या) मोटरची चोरी करणाऱ्या चौघांना कोलवा पोलिसांनी अटक केली आहे. या चौघांकडून मोटर जप्त करण्यात आली आहे. काणकोण येथून या मोटरची चोरी केली गेली होती. या मोटरची किंमत सुमारे दीड लाख रूपये इतकी आहे.

Canacona Boat Motor Thief
Art Of Goa: ...यामुळे 'पुढील वर्षापासून कलावृद्धी पुरस्कार देणार !' सांस्कृतिक मंत्र्यांची मोठी घोषणा

वीर नंदीकल (20), समीर देसाई (23), लक्ष्मीकांत गावकर (21), करन नाईक (26) अशी या संशयित चोरट्यांची नावे आहेत. हे सर्वजण मुळचे मळकर्णे, केपे येथील रहिवासी आहेत. त्यांच्याकडून दीड लाख रूपये किंमतीची मोटर जप्त करण्यात आली आहे. याशिवाय गुन्ह्यात वापरलेली टाटा एस ही गाडीही पोलिसांनी जप्त करण्यात आली आहे.

गोव्यातील समुद्र किनाऱ्यांवरील किनाऱ्यांवर मासेमारी करणाऱ्या अनेक बोटी नांगरलेल्या असतात. यात महागड्या मोटर्सचा वापर केला जातो. मोटर्सची क्षमता जितकी जास्त तितकी एखाद्या बोटीची ताकद, गती याची क्षमता ठरत असते. त्यामुळे या मोटर्स चोरण्याचे प्रकार घडत असतात. या चार जणांनी देखील काणकोण येथून ही चोरी केली होती. या चोरलेल्या मोटरची विक्री करण्याच्या प्रयत्नात हे चोरटे होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com