Minister Mauvin Godinho यांनी दाबोळी विमानतळावरील काळ्या - पिवळ्या टॅक्सी व्यवसायिकांनी गोवा माईल्स 'ॲप'मध्ये सहभागी व्हावे, असा सल्ला दिला. असे असताना दुसऱ्या बाजुला काळ्या - पिवळ्या टॅक्सी व्यावसायिकांनी गोवा माईल्ससोबत न जाता, स्वत:चे 'अॅप' तयार करणार असल्याचे म्हटले आहे.
(Minister Mauvin Godinho requested Dabolim taxi operators to participate in the 'Goa Miles' app)
मिळालेल्या माहितीनुसार या दौऱ्यावेळी वाहतुकमंत्री माविन गुदिन्हो यांनी दाबोळी विमानतळावर येणाऱ्या पर्यटकांना सेवा देणाऱ्या टॅक्सी व्यवसायिकांच्या विरोधाबाबत माहिती घेतली, तसेच इतर ठिकाणी पाहणी करत समस्या जाणून घेतल्या. यावेळी विमानतळावर येणाऱ्या पर्यटकांना कोणताही त्रास होता कामा नये, यासाठी खबरदारी घेण्याच्या सुचना अधिकारी वर्गाला दिल्या.
यावेळी वाहतुकमंत्री गुदिन्हो यांनी सांगितले की, जर टॅक्सी व्यवसायिकांना गोवा माईल्समध्ये जायचे असेल तर त्यांचे स्वागत केले जाईल. तसेच पर्यटकांना चांगली सेवा देण्यासाठी दाबोळी विमानतळावरील सर्व टॅक्सी व्यवसायिकांनी प्रामाणिकपणे कार्य करावे. पर्यटकांना चांगली सेवा देण्यासाठी राज्य सरकार विविध प्रकारे कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
'गोवा माईल्स'मध्ये जाणार नाही - युनायटेड टॅक्सीमॅन युनियन
टॅक्सी व्यवसायिकांना गोवा माईल्समध्ये सहभागी व्हा असे गुदिन्हो यांनी सांगितले असले तरी, दाबोळी विमानतळावर गेली 50 वर्षा पेक्षा जास्त काळ पर्यटकांना सेवा देणाऱ्या काळ्या - पिवळ्या टॅक्सी व्यवसायिक युनियनने गोवा माईल्समध्ये जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच युनियन काळ्या - पिवळ्या टॅक्सी व्यवसायिक पर्यटकांसाठी वेगळे अॅप तयार करणार अशी घोषणा केली.
यापुढे टॅक्सी व्यावसायिकांची मनमानी खपवून घेतली जाणार नाही- मंत्री गुदिन्हो
राज्याला दाबोळी आणि मोपा हे दोन्ही विमानतळ महत्त्वाचे आहेत. मात्र, सध्या दाबोळीवर टॅक्सी व्यावसायिकांची सुरू असलेली मनमानी येत्या काळात त्रासदायक ठरणार आहे. पर्यटकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे आमची जबाबदारी असून यापुढे टॅक्सी व्यावसायिकांची मनमानी खपवून घेतली जाणार नाही, असे गुदिन्हो म्हणाले.
या दौऱ्यात मंत्री गुदिन्हो यांच्यासमवेत वाहतुक संचालक राजन सातार्डेकर, कदंब वाहतुक मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ए. नेटो, सरव्यवस्थापक राजन घाटे, दाबोळी विमानतळ संचालक अनंत राव, मुरगाव तालुका सहाय्यक वाहतुक संचालक राजेश नाईक, दाबोळी विमानतळ वाहतुक पोलिस निरीक्षक राहुल धामस्कर, युनायटेड टॅक्सीमॅन युनियनचे अध्यक्ष विद्याधर दिवकर, प्रसाद प्रभूगावकर, संजय नाईक उपस्थित होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.