Govind Gaude: 'एसटी' आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्यांचा राजकारणासाठी वापर करू नका; मंत्री गोविंद गावडे यांचे आवाहन

आदिवासी भवनाच्या प्रांगणात गावकर, वेळीप यांचे भव्य पुतळे उभारणार
Govind Gaude
Govind GaudeDainik Gomantak
Published on
Updated on

Minister Govind Gaude on ST Reservation: एसटी समुदायाला आरक्षणासाठी 'उटा' संघटनेने केलेल्या आंदोलनातील शहीद मंगेश गावकर व दिलिप वेळीप यांच्या बलिदानाचा कुणीही राजकीय फायद्यासाठी वापर करू नये, असे आवाहन आदिवासी कल्याण मंत्री गोविंद गावडे यांनी केले. झिल्तावाडी- गावडोंगरी येथे ते बोलत होते.

मंगेश गावकर यांच्या बाराव्या स्मृती दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण आणि वास्तूचे अनावरण करण्याच्या कार्यक्रमाला मंत्री गवडे उपस्थित होते.

Govind Gaude
Goa Cabinet Meeting: राज्य मंत्रीमंडळ बैठकीतील महत्वाचे 4 निर्णय घ्या जाणून...

मंत्री गावडे म्हणाले की, या दोन्ही हुतात्मांसंदर्भात बोलण्याचा अधिकार फक्त उटा संघटनेला आहे. जे इतर काही लोक बोलतात ते एक तर उटा च्या आंदोलनात नव्हते. काहीजण स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी आंदोलनात उतरले होते, तर काहीजण या आंदोलनात पेरलेले नेते होते.

उटा संघटनेत ज्या आठ संस्थाचा समावेश होता त्यांनी कधीच आपला स्वार्थ पाहिला नाही.उटाच्या आंदोलनामुळेच तसेच वेळीप व गावकर या युवकांच्या बलिदानामुळे आदिवासी समाजाला आजचा दर्जा मिळाला आहे.

आदिवासी कल्याण खाते, अनुसूचित जाती महामंडळ, आदिवासी आयोग हे त्याचेच फलित आहे. त्याशिवाय आदिवासी कल्याण खात्यामधून चोवीस वेगवेगळ्या समाजांसाठी कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. याचे श्रेय उटा संघटनेला जाते.

पर्वरी येथे गौड मराठा समाजातर्फे सरकारच्या सहकार्याने आदिवासी भवन उभारण्यात येत आहे. त्या भवनाच्या प्रांगणात गावकर व वेळीप यांचे भव्य पुतळे उभारणार आहे. त्यासाठी सरकारची मान्यता घेतली आहे.

Govind Gaude
Goa-Patna Flight: गोवा-पाटणा थेट विमानसेवा सुरू; जाणून घ्या तिकीटाचे दर, वेळापत्रक...

सरकारतर्फे दरवर्षी प्रेरणा दिवस साजरा केला जातो. भारतातले गोवा हे एकमेव राज्य आहे जे बिगर सरकारी संघटनेच्या सहकार्याने आदिवासी समाजातील हुतात्म्यांच्या त्यागाचा सन्मान करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करीत आहे. याचा अर्थच सरकारने त्यांच्या त्यागाची दखल घेतली आहे.

गौड मराठा समाजाचे अध्यक्ष विश्वास गावडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी माजी मंत्री प्रकाश वेळीप, जिल्हा पंचायत सदस्य शोभना वेळीप, मंगेश गावकर यांचे वडील नागू गावकर व उटा संघटनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com