Babush Monserrate: कायमस्वरूपी अनुपस्थित राहण्याची मुभा द्या; मंत्री मोन्सेरात यांची मडगाव कोर्टाकडे विनंती

पणजी पोलिस स्टेशन हल्ला प्रकरण सुनावणी
Babush Monserrate
Babush MonserrateDainik Gomantak
Published on
Updated on

Babush Monserrate: पणजीचे आमदार आणि गोव्याचे महसूल मंत्री बाबुश मोन्सेरात यांनी पणजी पोलिस स्टेशन हल्ला प्रकरण खटल्यात कायमस्वरूपी अनुपस्थित राहण्याची मुभा द्यावी, अशी मागणी केली आहे.

तसा अर्ज त्यांनी मडगाव दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयात केला आहे. पुढील आठवड्यात शुक्रवारी 13 ऑक्टोबर रोजी त्यावर सुनावणी होणार आहे.

Babush Monserrate
Vishwajit Rane: आरोलकर हे सामान्य आमदार; त्यांनी आधी घरी येऊन मागणी केली होती अन् आता विरोध करताहेत...

दरम्यान, पणजी पोलिस ठाणे हल्ला प्रकरणाच आज, शुक्रवारी सुनावणी झाली. त्यावेळी मंत्री मोन्सेरात उपस्थित होते. न्यायाधीक्ष इर्शाद आगा यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे.

न्यायालायने याआधी मोन्सेरात यांना 30 सप्टेंबरपर्यंत सुनावणीस अनुपस्थित राहण्याची मुभा दिली होती.

दरम्यान, यावेळी मोन्सेरात यांच्या पत्नी आणि ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात अनुपस्थित होत्या. जेनिफर यांनीही अनुपस्थित राहण्याची मागणी केली होती, तथापि, ती न्यायालयाने फेटाळली होती. तथापि, त्यांचे वकील उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Damu Naik On Babush Office
Heavy Rain Goa
Santa Cruz BJP Candidate
Nepalese Man Acquitted In POCSO Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com