Mapusa Municipal Council: म्हापसा पालिका कर्मचारी उद्यापासून बेमुदत संपावर

म्हापसा पालिका कर्मचारी उद्यापासून (21 ऑक्टोबर) बेमुदत संपावर जाणार आहेत. ही माहिती कामगार संघटनेचे नेते केशव प्रभू यांनी दिली आहे.
mapusa municipal employees on indefinite strike from tomorrow
mapusa municipal employees on indefinite strike from tomorrow Dainik Gomantak

गोवा: म्हापसा पालिका कर्मचारी उद्यापासून (21 ऑक्टोबर) बेमुदत संपावर जाणार आहेत. ही माहिती कामगार संघटनेचे नेते केशव प्रभू यांनी दिली आहे. चार्टर ऑफ डिमांड मागणी पत्र पूर्ण करण्यास म्हापसा पालिका मंडळ अपयशी ठरल्याने तसेच; कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या पालिकेने पूर्ण न केल्यामुळे पालिका कर्मचारी संपावर जात असल्याची माहिती यावेळी प्रभू यांनी दिली.

(mapusa municipal employees on indefinite strike from tomorrow)

mapusa municipal employees on indefinite strike from tomorrow
Goa Rain Update: राज्यात आज व उद्या विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हाजेरी; IMD चा इशारा

उपलब्ध माहितीनुसार, म्हापसा नगरपालिका कर्मचार्‍यांच्या मागणी पत्रावर निर्णय घेण्यासाठी येत्या 31 ऑक्टोबरला पालिका मंडळाची सामान्य बैठक बोलावली आहे. मात्र, त्यापूर्वीच कामगारांनी पालिका मंडळाच्या वेळ काढुपणाच्या निषेधार्थ उद्यापासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, गुरुवारी (ता.20) याच संदर्भात कामगार आयुक्तांकडे सुनावणी झाली असता ती निष्फळ ठरल्याने वरील निर्णय घेण्यात आला आहे.

नगरपालिका मंडळाच्या बैठकीची नोटीस बुधवारी (ता.19) नगराध्यक्षा शुभांगी वायंगणकर यांनी काढली होती. दि. 31 रोजी, दुपारी 3.30 वा. आयोजित पालिका मंडळाच्या या बैठकीत दोन विषयच आहेत. ज्यात पेट्रोल पंपचे भाडेपट्टी करारचे नूतनीकरण आणि मागणी पत्रावर चर्चा व निर्णयाचा समावेश आहे.

mapusa municipal employees on indefinite strike from tomorrow
Goa News: म्हार्दोळ बाजारात सर्रासपणे प्लास्टिक पिशव्यांचा वापर

जूनमध्‍ये 19 कलमी मागणीपत्र (चार्टड ऑफ डिमांड) सादर केली होती

पालिका कर्मचारी संघटनेने म्हापसा पालिका मंडळाला जूनमध्‍ये 19 कलमी मागणीपत्र (चार्टड ऑफ डिमांड) सादर करून ते पूर्ण करण्याची केली होती. कर्मचारी संघटना व नगरपालिका यांच्‍यातील चार्टड ऑफ डिमांड करारपत्राची मुदत सप्टेंबर 2021मध्ये संपुष्टात आली आहे. या करारपपत्राचे नूतनीकरण करण्याची मागणीही संघटनेने केली आहे.

म्हापसा पालिका कर्मचाऱ्यांची काळी पट्टी बांधत मूक निदर्शने!

म्हापसा येथील नगरपालिका कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी येत्या 10 ऑक्टोबरपासून बेमुदत संपावर जाण्याची नोटीस यापूर्वीच पालिकेला दिली होती. मात्र, पालिका मंडळ ठोस निर्णय घेत नसल्याच्या निषेधार्थ या कर्मचाऱ्यांनी 3 ऑक्टोबरपासून दंडाला काळी पट्टी बांधून निषेध व्यक्त केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com