Mini Narkasur in Panjim
Mini Narkasur in PanjimDainik Gomantak

Panaji News : पणजी बाजारात मिनी नरकासुर दाखल

Mini Narkasur in Panjim: यासोबतच पणजी मार्केटमध्ये यंदा मिनी नरकासुर विक्रीसाठी ठेवण्यात आले असून ३५०० रूपयांपासून मिनी नरकासुरांची विक्री होत आहे.
Published on

Mini Narkasur in Panjim Diwali 2023: दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली असल्याने बाजारातही दिवाळीनिमित्त रेलचेल वाढली आहे.

दिवाळीसाठी लागणारे आकाशकंदील, पणत्या, रोषणाई माळा, फटाके, फराळाचे साहित्य आदींची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे.

यासोबतच पणजी मार्केटमध्ये यंदा मिनी नरकासुर विक्रीसाठी ठेवण्यात आले असून ३५०० रूपयांपासून मिनी नरकासुरांची विक्री होत आहे.

काही भागात लहान मुलांना नरकासुर बनविण्यासाठी लागणारे साहित्य उपलब्ध होत नसल्याने अशा रेडिमेड नरकासुर खरेदी करून मुलांना देत आहेत.

Mini Narkasur in Panjim
Narkasur In Goa: गोव्यातले महाकाय आणि भयावह नरकासुर पाहा

अशा मिनी नरकासुरांची मोठ्याप्रमाणात विक्री होत आहे. मंगळवारी पहाटे लागलेल्या पावसाने राज्यातील युवकांनी मोठ-मोठाले आकर्षक बनविलेल्या नरकासुर प्रतिमांना पावसाने भिजवल्याने आता काहीजण नव्याने पुन्हा नरकासुर उभारू लागले आहेत.

या मोठ्या नरकासुरांसाठी लागणारे आकर्षक मुखवट्यांचीही बाजारात विक्री होत असून रु. ५००, १००० असे आकाराप्रमाणे नरकासुरांच्या मुखवट्यांचे दर आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com