गोमन्तक डिजिटल टीम
गोव्यात दिवाळीपूर्व नरकासुर दहन (Narkasur In Goa) ही एक मोठी परंपरा आहे.
नरकासुराच्या महाकाय प्रतिकृती आणि जल्लोषात निघणारी भव्य मिरवणूक काढून पहाटे नरकासुराचे दहन केले जाते.
श्रीकृष्णाने नरक चतुर्दशीच्या दिवशी नरकासुराचा वध केला होता अशी आख्यायिका आहे. गोव्यात नरक चतुर्दशी उत्साहात साजरी केली जाते.
गोव्यात 25 ते 40 मीटर उंचीचे भल्यामोठे जवळपास 400 ते 500 नरकासुर बनविले जातात.
गोव्यात चौकाचौकात अक्राळविक्राळ स्वरूपातील नरकासुराच्या प्रतिकृती पाहायला मिळतात. त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते.
नरकासुराचा चेहरा जेवढा भयावह आणि बिभत्स करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न केला जातो. बक्षीस कुणाला मिळणार हे त्यावरच अवलंबून असते.
नरकासुर दहन केल्यानंतर सकाळी विविध प्रकारचे पोहे करून खाल्ले जातात आणि नंतरच गोव्यात खऱ्या अर्थानं दिवाळीला सुरूवात होते.