Goa Mines: खाणकामाबाबत मुख्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती; राज्यातील खाणी लवकरच..

खुशखबर : नीती आयोगाच्या बैठकीत माहिती
Goa Mining | Mining in Goa
Goa Mining | Mining in GoaDainik Gomantak

Goa Mines राज्यात लवकरच खाणकाम सुरू होणार असून सरकारने लोहखनिज खाणींच्या ई-लिलावासाठी पावले उचलली आहेत. चार लोहखनिज ब्लॉक्सचा पहिला लिलाव डिसेंबर 2022 मध्ये यशस्वीरित्या पूर्ण झाला आणि सरकारला त्यातून 43 कोटी रुपये मिळाले, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज, शनिवारी नीती आयोगाच्या बैठकीत दिली.

Goa Mining | Mining in Goa
Mahadayi Water Dispute: अखेर ‘म्हादई-प्रवाह’ला तीन महिन्यांनंतर मुहूर्त

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, हे चार खनिज ब्लॉक्सचे काम 2023-24 या आर्थिक वर्षात सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. आणखी पाच खाण ब्लॉक्सचा दुसरा लिलाव एप्रिल 2023 मध्ये पूर्ण झाला.

खनिज डंप हाताळण्यासाठी सरकार एक धोरण विकसित करण्याच्या प्रक्रियेत आहे. डंपची गुणवत्ता आणि प्रमाण यानुसार त्याचे स्वरूप समजून घेण्यासाठी डंप प्रोफाईल अभ्यासाची योजना आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com