Chapora River : 'शापोरा'तील वाळू उत्खननासाठी सावंत सरकारची सशर्त परवानगी, ऑनलाईन अर्ज सुरु

अर्ज करण्यासाठी 8 जानेवारी अंतिम तारीख
Chapora River
Chapora RiverDainik Gomantak

गोवा सरकारने राज्यातील वाळू उत्खननासाठी सशर्त परवानगी देणार असल्याची भुमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर आज खाण विभागाने शापोरा नदीतील वाळू उत्खननासाठी परवानगी देत, ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन दिले असल्याची माहिती समोर आली आहे.

(Mines dept invites online applications from local communities for undertaking sand mining in River Chapora)

मिळालेल्या माहितीनुसार शापोरा नदीतील वाळू उत्खनासाठी सरकारने सशर्त परवानगी दिली असून यासाठी खाण विभागाने स्थानिकांसाठी ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन दिले आहे. त्यामुळे वाळू उपसा करण्याकरीता स्थानिकांना नोंदणी करता येणार आहे.

गोवा सरकारने दिलेल्या परवानगीनुसार कोणतेही यंत्र न वापरता मनुष्यबळाचा वापर करत हा वाळू उपसा करावा लागणार आहे. तसेच उपसापरवानगी अर्ज भरण्यासाठी अंतिम तारीख 8 जानेवारी असल्याची माहिती समोर आली आहे.

Chapora River
Panjim: पणजीत सुसज्ज अन् स्वच्छ शौचालयांच्या सुविधांमध्ये वाढ करण्याची गरज

वाळू उपसा धोरणाबाबत सौम्य भुमिका

गोवा मुख्यमंत्र्यांनी राज्यातील वाळू उपसावर गेल्या काही दिवसांपासून बंदी होती. ती शिथील करत आता सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे गोव्यातील परवानगी दिलेल्या नद्यांमधील वाळू उपसा करता येणार आहे. सरकारच्या या भुमिकेने स्थानिकांमध्ये आता समाधानाचे वातावरण आहे.

Chapora River
Bhopal News: तीन वर्षांच्या मुलीवर स्कूल बस चालकाने केला बलात्कार, महिला मदतनीसही...'

गोवा प्रशासनाने याबाबत भुमिका स्पष्ट करताना म्हटले की, राज्यातील नद्यांमध्ये ज्या ठिकाणी रेतीचा थर वाढला आहे. त्या ठिकाणी रेती व्यवसायाला परवानगी दिली जाणार आहे. दोन नद्यांचा राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेकडून अहवाल आला आहे. या पार्श्वभूमीवर आज शापोरा नदीतील वाळू उपशाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com