Milk Analogue Products: अस्सल दुधाच्या नावावर स्वस्त 'ॲनालॉग' ची विक्री; हॉटेल्स, रेस्टॉरंट्सना मेन्यू आणि बोर्डवर स्पष्ट उल्लेख बंधनकारक

Milk Analogue Products in Goa: मिल्क ॲनालॉग पदार्थ तयार करताना नैसर्गिक दुधातील फॅट्स पूर्णपणे काढून त्याऐवजी स्वस्त वनस्पती तेल (हायड्रोजनेटेड व्हेजिटेबल ऑईल/पाम ऑईल) आणि स्टार्चचा वापर केला जातो.
Milk Analogue in Goa Hotels
Milk Analogue ProductsDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि मिठाई दुकानांमध्ये अस्सल दुग्धजन्य पदार्थांऐवजी स्वस्त आणि कृत्रिम ‘मिल्क ॲनालॉग’ पदार्थांचा वाढता वापर रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) कडक पावले उचलली आहेत.

दुकानावरील बोर्ड, मेन्यू कार्ड आणि डिस्प्ले ट्रे यांवर अशा पदार्थांचा स्पष्ट उल्लेख करणे प्रशासनाने बंधनकारक केले असून, सर्व व्यावसायिकांना यासाठी ४ दिवसांची मुदत दिल्याची माहिती संचालक श्वेता देसाई यांनी दिली आहे. मिल्क ॲनालॉग पदार्थ तयार करताना नैसर्गिक दुधातील फॅट्स पूर्णपणे काढून त्याऐवजी स्वस्त वनस्पती तेल (हायड्रोजनेटेड व्हेजिटेबल ऑईल/पाम ऑईल) आणि स्टार्चचा वापर केला जातो.

Milk Analogue in Goa Hotels
Goa Rakshan Yatra: काँग्रेस कार्यकर्त्यांना 'ऊर्जा'; शेकडोंच्या उपस्थितीत 'गोवा रक्षण यात्रे'ला प्रारंभ, 40 मतदारसंघांत 27 दिवसांचा दौरा

यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्स वाढण्याची तसेच फॅटी लिव्हरसारखे आजार होण्याचा धोका निर्माण होतो. शाकाहारी नागरिक प्रोटीनचा मुख्य स्रोत म्हणून पनीरवर अवलंबून असतात. मात्र, या कृत्रिम घटकांमुळे ग्राहकांचे मोठे नुकसान होत आहे.

अनेक उपाहारगृहे पनीरच्या नावाखाली स्वस्त ‘चीज ॲनालॉग’ आणि मिठाई दुकानांमध्ये खवा/मावा ऐवजी ‘मिल्क ॲनालॉग’ वापरत असल्याचे समोर आले आहे. अस्सल दुधाच्या पदार्थांचे पैसे वसूल करून स्वस्त पर्याय देणे, ही ग्राहकांची उघडपणे दिशाभूल असून अन्न सुरक्षा आणि मानक कायद्याचे स्पष्टपणे उल्लंघन आहे.

महाराष्ट्र, गुजरातेत बंदी, गोव्यात शिरकावाची भीती

महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांत ‘मिल्क ॲनालॉग’वर बंदी घातल्यानंतर किंवा कडक निर्बंध आणल्यानंतर, या स्वस्त घटकांची गोव्यात बेकायदेशीर वाहतूक आणि विक्री वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पर्यटन राज्य असल्याने उपाहारगृहे व कॅटरर्समध्ये अशा बनावट पदार्थांचा खप वाढण्याचा धोका व्यक्त करण्यात येत आहे.

Milk Analogue in Goa Hotels
Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

‘ॲनालॉग’ म्हणजे काय?

‘ॲनालॉग’ म्हणजे अस्सल दूध किंवा दूधजन्य पदार्थांऐवजी वनस्पती तेल, स्टार्च आदी वापरून तयार केलेला पर्यायी पदार्थ. याचा वापर स्वस्त पर्याय म्हणून पनीर, खवा, चीज किंवा दूधजन्य पदार्थांमध्ये केला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com