Mapusa News :‘एमआरएफ’ शेड स्थलांतरित करा ; सिरसई ग्रामस्थांची मागणी, कोनशी झरीला धोका

पाणवठ्यांवर विपरित परिणाम होणार असल्याने ग्रामस्थांनी अस्नोडा पंचायतीला संबंधित एमआरएफ शेड स्थलांतरित करण्याची विनंती केली.
MRF Shed
MRF ShedDainik Gomantak
Published on
Updated on

Mapusa News : म्हापसा, कोनशी झरीच्या संवर्धनाच्या मागणीसाठी सिरसई-अस्नोडा गावाच्या सीमेवर येत असलेल्या अस्नोडा साहित्य पुनर्प्राप्ती सुविधा स्थलांतरित करण्याच्या मागणीसाठी रविवारी (ता.२२) सिरसईवासीयांसह समविचारी लोकांनी मानवी साखळी केली.

पाणवठ्यांवर विपरित परिणाम होणार असल्याने ग्रामस्थांनी अस्नोडा पंचायतीला संबंधित एमआरएफ शेड स्थलांतरित करण्याची विनंती केली.

रविवारी सिरसई-अस्नोडा सीमेवर बांधकाम सुरू असलेल्या मटेरियल रिकव्हरी सुविधेला विरोध करण्यासाठी सिरसईचे ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक, तरुण मुले यांच्यासह विविध समविचारी लोक गावात जमले.

अस्नोडा पंचायतीने प्रस्तावित केलेल्या एमआरएफला ग्रामस्थ विरोध करत आहेत. कारण, पावसाळ्यात कचरा पाण्याच्या प्रवाहात झरे व धबधब्यात वाहून येईल, आणि हाच कचरा नंतर विसर्जनासाठी ग्रामस्थ वापरत असलेल्या तलावात येईल, अशी भीती ग्रामस्थांना वाटते.

या आंदोलनादरम्यान ग्रामस्थांनी घोषणा दिल्या व प्रस्तावित एमआरएफजवळ मानवी साखळीही केली. मनोज हळदणकर, आरटीआय कार्यकर्ते राजन घाटे, पर्यावरणवादी रमेश गावस, शंकर पोळजी, विद्याधर भगत आदींसह विविध मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.

मनोज हळदणकर म्हणाले की, अस्नोडा पंचायतीने कोनशी येथे शेडचा प्रस्ताव दिल्याने पुढील तीन वर्षांत आमच्या गावातील हिरवळ नष्ट होण्याची शक्यता आहे.

MRF Shed
Goa Cruise Vessels: यंदाच्या पर्यटन हंगामात गोव्यात येणार 31 आंतरराष्ट्रीय क्रूझ जहाजे

भावी पिढ्यांसाठी आपण आपला निसर्ग जतन करायचा आहे. सिरसई गावासाठी हा झरा व तलाव महत्त्वाचे आहेत.

बार्देशच्या लोकांनी जागृत होऊन आपल्या भावी पिढीसाठी पर्यावरण संवर्धनासाठी काम केले पाहिजे. आमदार असलेले मंत्री आपल्या भावी पिढीसाठी काय करत आहेत, असा प्रश्‍नही येथे उपस्थित होत आहे.

- राजन घाटे, आरटीआय कार्यकर्ते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com