‘अक्षयपात्र‘ने पुन्हा तीन महिन्यांची मुदत मागितली! विद्यार्थ्यांच्या माध्यान्ह आहाराचा प्रश्‍न मिटेना

Goa News: करार झाल्यानंतर स्वयंपाकघर आणि इतर पायाभूत सुविधा उभारण्यासाठी फाऊंडेशनने सहा महिन्यांची मुदत मागितली होती त्यानुसार त्यांचा मुदतीचा कालावधी संपल्याने अद्यापही सुविधा निर्माण झाल्या नाहीत
Goa News: करार झाल्यानंतर स्वयंपाकघर आणि इतर पायाभूत सुविधा उभारण्यासाठी फाऊंडेशनने सहा महिन्यांची मुदत मागितली होती त्यानुसार त्यांचा मुदतीचा कालावधी संपल्याने अद्यापही सुविधा निर्माण झाल्या नाहीत
Poshahaar YojanaNLD
Published on
Updated on

Goa Canacona Midday Meal Scheme

पणजी: काणकोण तालुक्यातील सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनाचा पुरवठा सुरू करण्यासाठी गोवा सरकारने निविदा प्राप्त बंगळुरूस्थित ‘अक्षय पात्र’ फाउंडेशनशी (Akshaya Patra Foundation) करार केला आहे. परंतु करार झाल्यानंतर स्वयंपाकघर आणि इतर पायाभूत सुविधा उभारण्यासाठी फाऊंडेशनने सहा महिन्यांची मुदत मागितली होती. त्यानुसार त्यांचा मुदतीचा कालावधी संपल्याने अद्यापही सुविधा न निर्माण झाल्याने फाऊंडेशनने पुन्हा शिक्षण खात्याकडे तीन महिन्यांची मुदत मागितल्याची माहिती समोर आली आहे.

‘अक्षयपात्र’ने मागितलेल्या मुदतीला शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी दुजोरा दिला आहे. माध्यान्ह आहार पुरविण्याविषयी स्वयंसाह्य गटांनी नकारघंटा वाजवल्याने सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांच्या माध्यान्ह आहाराचा प्रश्‍न गतवर्षी निर्माण झाला होता. या विद्यार्थ्यांसाठी २०२३ मध्ये शिक्षण संचालनालयाने देशपातळीवर माध्यान्ह आरार पुरविणाऱ्यांसाठी निविदा प्रक्रिया केली आणि ती निविदा ‘अक्षयपात्र‘ या संस्थेला मिळाली. या संस्थेने आहार बनविण्यासाठी व पुरवण्यासाठीची यंत्रणा गोव्यात निर्माण करायची होती, पण त्या मुदतीत ती यंत्रणा उभारली गेली नाही. त्यामुळे या फाऊंडेशनने आणखी तीन महिन्यांची मुदत शिक्षण खात्याकडे मागितली आहे.

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये, शिक्षण संचालनालयाने ९८ स्वयंसाह्य गट आणि नऊ पालक-शिक्षक संघटनांसोबत (पीटीए) एक वर्षाच्या कराराचे नूतनीकरण केले, जे सध्या राज्यातील १.६०लाख विद्यार्थ्यांना जेवण पुरवतात.

Goa News: करार झाल्यानंतर स्वयंपाकघर आणि इतर पायाभूत सुविधा उभारण्यासाठी फाऊंडेशनने सहा महिन्यांची मुदत मागितली होती त्यानुसार त्यांचा मुदतीचा कालावधी संपल्याने अद्यापही सुविधा निर्माण झाल्या नाहीत
बंगळुरूस्थित अक्षयपात्र फाउंडेशन देणार राज्यातील पाच हजार विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहार...

पाच एजन्सींमधून ‘अक्षयपात्र’ची निवड

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या निर्देशांनंतर, शिक्षण संचालनालयाने मागील वर्षी पूर्व-प्राथमिक, प्राथमिक आणि उच्च प्राथमिक वर्गातील मुलांना ‘ताजे गरम शिजवलेले मिड-डे-मील’ पुरवण्यासाठी देशात कार्यरत असलेल्या नागरी समाज संघटना किंवा बिगर सरकारी संघटनांकडून ऑनलाइन बोली मागवली होते. शिक्षण संचालनालयाने एकूण पाच एजन्सी निवडल्या, ज्यात बंगळुरू स्थित अक्षय पात्र फाउंडेशन, दिल्ली स्थित स्त्री शक्ती फाउंडेशन, घनश्याम सेवा समिती, केंद्रीय भंडार-मुंबई आणि नॅशनल फेडरेशन ऑफ फार्मर्स यांचा समावेश होता. अखेर ‘अक्षयपात्र’ची निविदा स्वीकारली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com