Goa Politics: राजकीय कारकिर्दीची सुरुवात जिथून, तिथेच मिकी पाशेको यांची वापसी; 2027 ची निवडणूक बाणावलीतून लढवणार!

Mickey Pacheco Benaulim Election: माजी आमदार आणि माजी मंत्री मिकी पाशेको यांनी २०२७ ची विधानसभा निवडणूक बाणावली मतदारसंघातून लढविणार असल्याचे शुक्रवारी जाहीर केले.
Mickey Pacheco Benaulim Election
Goa PoliticsDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

मडगाव: माजी आमदार आणि माजी मंत्री मिकी पाशेको यांनी २०२७ ची विधानसभा निवडणूक बाणावली मतदारसंघातून लढविणार असल्याचे शुक्रवारी जाहीर केले. युनायटेड गोवन्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या (युगोडेपा) उमेदवार म्हणून आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

२००२ मध्ये युगोडेपा पक्षाच्या उमेदवारीवर पाशेको पहिल्यांदा बाणावली मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. २००७ ची निवडणूकही त्यांनी याच मतदारसंघातून लढवली. त्यानंतर २०१२ च्या विधानसभा निवडणुकीत ते नुवे मतदारसंघातून रिंगणात उतरले होते.

Mickey Pacheco Benaulim Election
Goa Politics: पार्सेकरांची भाजपमध्ये लवकरच घरवापसी? उत्पल पर्रीकरही पुनर्प्रवेशाच्या विचारात; मांद्रे-पणजीच्या राजकीय समीकरणांची चर्चा

‘माझ्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात बाणावली मतदारसंघातून झाली. या मतदारसंघाने मला राजकीय प्रतिष्ठा आणि प्रेम दिले. आजही येथील लोकांशी माझे चांगले संबंध आहेत. त्यांच्याच मागणीवरून मी पुन्हा बाणावलीतून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे,’ असे पाशेको यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

पाशेको यांनी यापूर्वी युगोडेपा पक्ष सोडून स्वतःच्या पक्षाची स्थापना केली होती. मात्र, आता त्यांनी पुढाकार घेऊन युगोडेपा पक्षाची पुनर्रचना केली आहे. गोव्यातील काही मतदारसंघांतून युगोडेपा उमेदवार उभे करणार असल्याची घोषणाही त्यांनी यापूर्वी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com