मुंडकारप्रश्नी लोबो गाठणार मामलेदारांची कार्यालयं

कुळ मुंडकारांची प्रकरणे रेंगाळण्यामागील कारणे मायकल लोबो शोधणार
Michael Lobo
Michael LoboDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा : कूळ-मुंडकर आणि म्युचेशनसंदर्भातील गोवाभरातील प्रकरणे तेजगतीने निकालात काढावीत, अशी लोकांची आग्रही मागणी आहे. अशी प्रकरणे रेंगाळण्यामागील कारण जाणून घेण्यासाठी आपण म्हापसा कार्यालयाला भेट दिली आहे. इतर सर्व तालुक्यातील प्रकरणांचा आढावा घेण्यासाठी राज्यातील सर्वच्या सर्व मामलेदार कार्यालयांना भेटी देऊन कुळ-मुंडकार प्रश्न मामलेदारांपुढे मांडून सोडवला जाईल, अशी माहिती विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी दिली.

Michael Lobo
गोव्यात प्रशासकीय खांदेपालट, बड्या अधिकाऱ्यांची बदली

लोबो म्हणाले, बार्देशच्या सहाही मामलेदारांच्या न्यायालयांत 2,910 प्रकरणे दीर्घकाळ प्रलंबित आहेत. त्यात मुंडकार डिक्लेरेशन 484, मुंडकार पर्चेस 203, कृषी टेनन्सी 949, टेनन्सी पर्चेस 141 व म्युचेशन 1933 अशा प्रकरणांचा समावेश आहे. तसेच, उपजिल्हाधिकाऱ्यांकडे बेकायदा बांधकामे कायदेशीर करण्याची प्रकरणेही प्रलंबित आहेत. ती प्रकरणे जलदगतीने विशिष्ट कालमर्यादेत निकालात काढली जावीत म्हणून मुख्यमंत्री, महसूलमंत्री, जिल्हाधिकारी, विरोधी पक्षनेता, ज्येष्ठ विरोधी आमदार यांची संयुक्त बैठक होणे आवश्यक आहे. त्या बैठकीत ही गेली अनेक प्रलंबित असलेली प्रकरणे निकालात काढण्यासाठी खास समितीची नियुक्ती केली जावी आणि या समितीद्वारे मामलेदार व उपजिल्हाधिकाऱ्यांना एक-दोन वर्षांचा वेळ दिला जावा आणि न्यायालयाद्वारे लोकांना न्याय मिळावा, अशी सूचना मी महसूलमंत्र्यांना करणार, असल्याचे लोबो यांनी सांगितले.

Michael Lobo
गिरीश चोडणकर पुन्हा ‘सरां’च्या भूमिकेत

मायकल लोबो यांनी बुधवारी म्हापसा सरकारी संकुल इमारतीला भेट दिली. यावेळी त्यांनी सर्व मामलेदार व उपजिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. प्रलंबित खटले निकालात काढण्याबाबत भेडसावणाऱ्या दैनंदिन समस्या जाणून घेतल्या. मामलेदार आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या न्यायालयासमोरील कुळ-मुंडकार आणि म्युचेशन प्रकरणे जलदगतीने निकालात काढण्यासाठी खास समितीची नियुक्ती करावी, अशी मागणी मायकल लोबो यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com