Mhaje Ghar: 'हे सरकारचे ऐतिहासिक पाऊल'! विश्‍वजीत राणेंचे प्रतिपादन; वाळपईत ‘माझे घर’ योजनेचे अर्ज वाटप

Vishwajit Rane: लोकांना हक्काचे घर देणे, हे सरकारचे ऐतिहासिक पाऊल आहे, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी वाळपई येथे केले
Mhaje Ghar
Mhaje GharDainik Gomantak
Published on
Updated on

वाळपई: विरोधक केवळ विधानसभेत गोंधळ घालतात, लोकांची दिशाभूल करतात. प्रत्येक पंचायतीत वकील तज्ज्ञ नेमून नागरिकांना मार्गदर्शन केले जाणार आहे. लोकांना हक्काचे घर देणे, हे सरकारचे ऐतिहासिक पाऊल आहे, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी वाळपई येथे केले

वाळपई येथील कदंब बसस्थानकाच्या सभागृहात सत्तरी तालुक्यातील लाभार्थ्यांना ‘माझे घर’ योजनेचे अर्ज वितरित करताना ते बोलत होते. या प्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आमदार डॉ. दिव्या राणे, नगराध्यक्ष प्रसन्ना गावस, अतिरिक्त जिल्हाधिकारी गुरुदास देसाई, उपजिल्हाधिकारी लक्ष्मीकांत कुट्टीकर आदी मान्यवर उपस्थित होते.

आपण राहात असलेल्या घरांवर कायदेशीर हक्क मिळावा, हेच स्वप्न साकार करण्यासाठी राज्य सरकारने ‘माझे घर’ योजना सुरू केली आहे. गोवा मुक्तीनंतर नागरिक सुशेगाद जीवन जगत आहेत; परंतु अनेकांकडे त्यांच्या वास्तव्याच्या घराचा कायदेशीर हक्क नाही.

Mhaje Ghar
Mhaje Ghar: 'फोंड्याला पोरका समजू नका'! CM सावंतांचे भावनिक आवाहन; घरे कायदेशीर करून देणार असल्याची दिली ग्वाही

सरकारचा उद्देश कोणाचेही घर तोडण्याचा नाही; तर ती घरे कायदेशीर करण्याचा आहे. म्हणूनच ‘माझे घर’ ही योजना सुरू केली आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.मुख्यमंत्री म्हणाले, विरोधकांना लोकांची घरे कायदेशीर व्हावी असे वाटत नाही. ते फक्त टीकाच करतात.

Mhaje Ghar
Mhaje Ghar: 'भाजप सरकार कोणाचेच घर मोडणार नाही'! मुख्यमंत्र्यांची ग्वाही; सर्व घरे कायदेशीर करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा

आमदार डॉ. दिव्या राणे म्हणाल्या, घर म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा आत्मसन्मान आणि सुरक्षिततेचा आधार. कायदेशीर घर मिळाल्याने त्या कुटुंबाचा आत्मसन्मान वाढेल. ही लोककल्याणकारी आणि क्रांतिकारी योजना प्रत्येक दारी पोहोचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com