Mhaje Ghar: 'फोंड्याला पोरका समजू नका'! CM सावंतांचे भावनिक आवाहन; घरे कायदेशीर करून देणार असल्याची दिली ग्वाही

Ponda Mhaje Ghar: मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते काही लाभार्थींना अर्जांचे वितरण करण्यात आले. सावंत म्हणाले, कुळ मुंडकारांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी रवी नाईक यांनी कार्य केले.
 Ponda constituency
Ponda constituencyDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: रवी नाईक यांनी मुख्यमंत्री असताना ज्याप्रमाणे कूळ-मुंडकारांना त्यांचे हक्क मिळवून दिले, नेमके त्याच धर्तीवर आता भारतीय जनता पक्षाचे सरकार गोमंतकीयांना त्यांची घरे कायदेशीर करून देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. फोंड्यात शनिवारी माझे घर योजनेचे अर्ज वितरण कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.

यावेळी फोंड्याचे नगराध्यक्ष आनंद नाईक, उपनगराध्यक्ष दीपा कोलवेकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी विशाल कुंडईकर, नगरसेवक रितेश नाईक, विश्‍वनाथ दळवी, कुर्टी खांडेपार सरपंच नावेद तहसीलदार तसेच पालिका मुख्याधिकारी व उपजिल्हाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते काही लाभार्थींना अर्जांचे वितरण करण्यात आले. सावंत म्हणाले, कुळ मुंडकारांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी रवी नाईक यांनी कार्य केले, त्याला तोड नाही, त्यासाठी आता गोमंतकीयांना त्यांची हक्काची घरे कायदेशीर करण्यासाठी सरकार प्रयत्नरत राहणार असून विरोधकांनी कितीही विरोध केला तरी आम्ही लोकांची घरे कायदेशीर करणारच, असे सांगताना आम्ही घरे मोडण्यासाठी नव्हे तर उभारण्यासाठी कार्यरत राहू, अशी ग्वाही प्रमोद सावंत यांनी दिली.

 Ponda constituency
Ponda: फोंडा पोटनिवडणुकीचा विषय 'दिल्ली'त! प्रदेशाध्यक्ष दामूंना पाचारण; उमेदवाराच्या नावावरून चर्चांना उधाण

माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांचे निधन झाले असले तरी फोंड्याला पोरका समजू नका. फोंडा मतदारसंघाची संपूर्ण जबाबदारी माझी असून प्रत्येकाला त्याचे न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी आपण कार्यरत राहणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

 Ponda constituency
Ponda By Election: फोंड्यात भाजपची उमेदवारी कुणाला? रवी पुत्रांना सहानुभूती; पोटनिवडणूक बिनविरोध होण्‍याची शक्‍यता कमी

उमेदवार निवड पक्षाकडून!

फोंडा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपचा कोण उमेदवार असेल असे विचारले असता तो निर्णय पक्ष घेणार आहे. आपण मुख्यमंत्री त्याबद्दलचा निर्णय घेऊ शकत नाही, असे सांगताना फोंड्याला योग्य उमेदवार भाजपकडून दिला जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com