Sanctuaries In Goa: या उन्हाळी सुट्टीत करा सफर गोव्यातल्या अभयारण्यांची! कसे जाल, काय पहाल; संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Goa Sanctuaries: गोवा केवळ सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठीच प्रसिद्ध नाही तर इथले निसर्गसौंदर्य आणि वन्यजीवन समृद्ध आहे.
Goa sanctuaries
Goa sanctuariesDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Tourism

पणजी : गोवा केवळ सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठीच प्रसिद्ध नाही तर इथले निसर्गसौंदर्य आणि वन्यजीवन समृद्ध आहे. घनदाट जंगलांनी वेढलेले गोव्याचे निसर्गरम्य प्रदेशात अनेक प्रकारच्या वनस्पती आणि वन्यजीव पाहता येतात.

गोवा राज्यात प्रामुख्याने येथे भगवान महावीर अभयारण्य, खोतीगाव अभयारण्य, नेत्रावळी वन्यजीव अभयारण्य आणि म्हादई अभयारण्य ही प्रमुख ठिकाणे आहेत. येथे तुम्हाला अनेक प्राणी, बरेच दुर्मिळ पक्षी आणि फुलपाखरे पाहायला मिळतात. गोव्यात असणारी अभयारण्ये, तिथे जाण्याचे सोपे मार्ग आणि जाण्याची वेळ याबद्दल विस्तृत माहिती आज आपण घेऊ.

डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य (Dr. Salim Ali Bird Sanctuary)

भारतातील प्रख्यात पक्षीशास्त्रज्ञ डॉ. सलीम अली यांच्या नावे असलेले, सलीम अली पक्षी अभयारण्य हे गोव्यातील महत्वाचे संरक्षित अभयारण्य आहे. इथे अनेक प्रकारचे पक्षी पाहता येतात. किंगफिशर, बगळे, गरुड, मैना असे अनेक पक्षी इथे सहजासही पाहता येतात. तसेच हे अभयारण्य पणजीपासून जवळच आहे. सकाळी ६ ते संध्याकाळी सहा या वेळेत इथे भेट देता येते.

कसे जाल

हे अभयारण्य मोपा विमानतळापासून ३९ किमी तर दाबोळीपासून ३० किमी अंतरावर आहे. पणजी बस्थानकापासून हे अंतर फक्त ४ किमी आहे.

म्हादई अभयारण्य (Mhadei Wildlife Sanctuary)

म्हादई अभयारण्य गोव्यातील सत्तरी परिसरात आहे. या अभयारण्याची एकूण जागा 208 चौ. किमीच्या आसपास आहे. या अभयारण्यात गर्द वनराईसोबत प्राणिसंपदेचा अनुभव घेता येऊ शकतो. सध्या इथे प्रोजेक्ट टायगर अंतर्गत इथे व्याघ्र प्रकल्प सुरु करण्याचा विचार सुरु आहे. ऑक्टोबर ते मार्च इथे भेट देण्याचा उत्तम कालावधी आहे. पावसाळयात इथे राफ्टिंग टूरचा आनंद घेता येतो. सकाळी ८ ते सायंकाळी ५. या वेळेत तुम्ही इथे भेट देऊ शकता.

कसे जाल

हे अभयारण्य मोपा विमानतळापासून ६० किमी तर दाबोळीपासून ६८ किमी अंतरावर आहे. पणजी बस्थानकापासून हे अंतर ५१ किमी आहे.

भगवान महावीर अभयारण्य (Bhagwan Mahaveer Wildlife Sanctuary)

हे अभयारण्य मोले गावाजवळ आहे. जवळपास 240 चौरस किमी व्यापलेलं भगवान महावीर अभयारण्य हे गोव्यातील सर्वात मोठं अभयारण्य आहे. या अभयारण्यात पर्यटक विविध वनस्पती, वन्यजीव आणि पक्ष्यांची भेट घेऊ शकतात. या अभयारण्याला वर्षभरात कधीही भेट देता येते परंतु पावसाळ्यानंतर ते हिवाळा संपेपर्यंत इथे भेट दिल्यास हिरवेगार निसर्गसौंदर्य पाहता येते. उन्हाळ्यात सुट्टीनिमीत्य पर्यटक इथे गर्दी करतात. पर्यटकांसाठी हे अभयारण्य सकाळी 8 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत खुलं असतं.

कसे जाल

हे अभयारण्य मोपा विमानतळापासून ६० किमी तर दाबोळीपासून ६८ किमी अंतरावर आहे. पणजी बस्थानकापासून हे अंतर ५१ किमी आहे.

खोतीगाव अभयारण्य (Cotigao Wildlife Sanctuary)

खोतीगाव अभयारण्य गोवा आणि कर्नाटकच्या सीमेवर वसलेले आहे. हे गोव्यातील दुसरे मोठे अभयारण्य आहे. खोतीगाव दक्षिण गोव्यातील काणकोण या तालुक्यात आहे. इथे रात्रभर मुक्काम करण्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र यासाठी वनखात्याच्या नियमानुसार परवानगी घेणं आणि सर्व अटींचे पालन करणं आवश्यक आहे. इथे अनेक वृक्षांच्या प्रजाती पाहत, अनेक पक्षी पाहता येतात. हे अभयारण्य दररोज सकाळी 7 ते संध्याकाळी 5.30 पर्यंत खुलं असतं.

कसे जाल

हे अभयारण्य मोपा विमानतळापासून १२२ किमी तर दाबोळीपासून ८३ किमी अंतरावर आहे. पणजी बसस्थानकापासून हे अंतर ९० किमी आहे.

बोंडला प्राणी संग्रहालय ( Bondla Wildlife Sanctuary)

बोंडलाप्राणी संग्रहालय फोंडा तालुक्यात असून जवळपास 8 चौ. किमी परिसरात आहे. परिवारासोबत वेळ घालवायचा असेल आणि सोबत वन्यजीव पाहायचे असतील तर या ठिकाणी नक्कीच भेट द्यावी. इथे तुम्हाला गव्यांचे कळप, बिबट्या, अस्वले यांचा वावर दिसून येतो. बोंडला प्राणी संग्रहालयाला तुम्ही सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत भेट देऊ शकता.

कसे जाल

हे अभयारण्य मोपा विमानतळापासून ५८ किमी तर दाबोळीपासून ४६ किमी अंतरावर आहे. पणजी बसस्थानकापासून हे अंतर ४३ किमी आहे.

नेत्रावळी अभयारण्य (Netravali Wildlife Sanctuary)

नेत्रावळी अभयारण्य हे भारताच्या दक्षिण गोवा जिल्ह्यात वसलेले आहे. हे अभयारण्य पश्चिम घाटाच्या उतारांवर विस्तारले असून सुमारे 211 चौ.किमी. क्षेत्र व्यापते. या अभयारण्याच्या परिसरातून नेत्रावली नदी उगम पावते, जी पुढे जाऊन झुवारी नदीला मिळते. नेत्रावली अभयारण्यात विविध प्रकारचे प्राणी आढळतातहे अभयारण्य जैवविविधतेने समृद्ध असून निसर्गप्रेमी आणि वन्यजीव अभ्यासकांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे.

कसे जाल

हे अभयारण्य मोपा विमानतळापासून ११० किमी तर दाबोळीपासून ७४ किमी अंतरावर आहे. पणजी बस्थानकापासून हे अंतर ८२ किमी आहे.

मोले राष्ट्रीय उद्यान (Mollem National Park)

मोलेम राष्ट्रीय उद्यान, ज्याला भगवान महावीर अभयारण्य म्हणूनही ओळखले जाते, हे गोवा, भारतातील पश्चिम घाटात स्थित २४० किमी संरक्षित क्षेत्र आहे, जे बिबट्या, हत्ती, हरीण आणि भारतीय बायसनसह विविध वनस्पती आणि प्राण्यांसाठी ओळखले जाते. मोलेम राष्ट्रीय उद्यान हे मोठ्या भगवान महावीर अभयारण्याचा एक भाग आहे, जे गोव्यातील सर्वात मोठे संलग्न वन्यजीव संरक्षित क्षेत्र आहे.

कसे जाल

हे उद्यान मोपा विमानतळापासून 108 किमी तर दाबोळीपासून 72 किमी अंतरावर आहे. पणजी बस्थानकापासून हे अंतर 80 किमी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com