Mhadei Water Dispute: 'म्‍हादई' नदीची ताबडतोब पाहणी करा, सरकारची 'म्‍हादई प्रवाह'कडे मागणी; 'इंटरलोक्युटरी' अर्ज सादर करणार

Mhadei River Latest News: म्‍हादई नदीची तत्‍काळ पाहणी करण्‍याची मागणी आम्‍ही ‘म्‍हादई प्रवाह’कडे केली आहे.
Mhadei River Latest News
Mhadei Water DisputeDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: म्‍हादई नदीची तत्‍काळ पाहणी करण्‍याची मागणी आम्‍ही ‘म्‍हादई प्रवाह’कडे केली आहे. त्‍यांनी तसे न केल्‍यास आपल्‍याशी बैठक घ्‍यावी, असेही त्‍यांना सांगण्‍यात आले आहे.

सर्वोच्‍च न्‍यायालयात लवकरच याबाबत ‘इंटरलोक्युटरी’ अर्ज सादर केला जाईल, असे मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ॲडव्‍होकेट जनरल देविदास पांगम यांच्‍यासह म्‍हादई खटला लढणारे कायदा पथक बैठकीला उपस्‍थित होते.दरम्‍यान, मुख्‍यमंत्री म्‍हणाले, म्‍हादई नदीबाबत सरकार गंभीर आहे.

Mhadei River Latest News
Goa Coastal Zone Management Plan: गोव्याचा सीआरझेड आराखडा तयार, पण अंतिम मंजुरी बाकी; महिनाभरात हरकती-सूचनांसाठी खुला होणार?

पर्वरी उड्डाणपुलाचा चार राज्‍यांना फायदा

येत्‍या ९ सप्‍टेंबरला केंद्रीय रस्‍ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्‍या हस्‍ते उद्‍घाटन होणाऱ्या पर्वरी उड्डाणपुलाची आपण पाहणी करून आढावा घेतला आहे. ‘राष्‍ट्रीय महामार्ग-६६’वर हा उड्डाणपूल येतो. हा मार्ग महाराष्‍ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ असा आहे. त्‍यामुळे त्‍याचा फायदा केवळ गोमंतकीयांनाच नाही, तर इतर तीन राज्‍यांतील जनतेलाही मिळणार आहे, असेही मुख्‍यमंत्री सावंत म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com