Mhadei Prawah Inspection: आक्षेपार्ह जागांच्या पाहणीला कर्नाटकची टाळाटाळ

Mhadei River Basin: ‘प्रवाह’ची कर्नाटकात म्हादई खोऱ्याला भेट
Mhadei River Basin:  ‘प्रवाह’ची कर्नाटकात म्हादई खोऱ्याला भेट
Mhadei basin Dainik Gomantak

म्हादई जलवाटप तंटा लवादाच्या शिफारसीनुसार केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या म्हादई प्रवाह प्राधिकरणाच्या सदस्यांनी आज (ता. ७) कणकुंबी येथे कोसळणाऱ्या मुसळधार पावसातच म्हादई आणि मलप्रभा नदीच्या पाणलोट क्षेत्रांना, तसेच कळसा-भांडुरा प्रकल्पाला भेट दिली.

मात्र, गोव्‍याचा आक्षेप असलेला पारवाड नाला दाखवण्‍यास कर्नाटकच्‍या सदस्‍यांनी टाळाटाळ केली, अशी माहिती पर्यावरण अभ्‍यासक राजेंद्र केरकर यांनी दिली. परिणामी आज बंगळूर येथे होणाऱ्या बैठकीत गोव्‍याने सक्षमपणे बाजू मांडणे आवश्‍‍यक आहे.

प्रवाह प्राधिकरणाच्या पथक प्रमुख पी. एम. स्कॉट यांच्या नेतृत्वाखालील या पथकासह पाटबंधारे विभागाचे वीरेंद्र शर्मा, मनोज तिवारी, नीरज मांगलिक, मिलिंद नायक, सुभाष चंद्र, प्रमोद बदामी आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Mhadei River Basin:  ‘प्रवाह’ची कर्नाटकात म्हादई खोऱ्याला भेट
Mhadei Prawah Inspection: म्हादई 'प्रवाह' प्राधिकरण पथकाची गोव्यातून पाहणीला सुरुवात

कर्नाटक पाटबंधारे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राजेश अम्मीनभावी यांनी गोव्याहून आलेल्या या पथकाचे कणकुंबी जंगलातील कळसा नाल्याजवळ स्वागत केले. या पथकाने कर्नाटक-गोवा सीमेवरील कणकुंबी आणि लगतच्या जंगलांना भेट दिली. म्हादई आणि मलप्रभा नद्यांचा संगम असलेल्या अलात्री खड्डा, सुरल खड्डा, बैल खड्डा, कोटणी खड्डा, भांडुरी खड्डा आणि कळसा खड्डा येथे पाहणी केली आणि कणकुंबीची सद्यस्थिती तपासली. 

यानंतर कणकुंबी येथे बैठक घेऊन कर्नाटक पाटबंधारे महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून म्हादई व मलप्रभा पाणलोट प्रकल्पाची सविस्तर माहितीही घेतली. यावेळी अधिकाऱ्यांनी पथकाला सर्वसमावेशक माहिती दिली आणि कागदपत्रेही सादर केली.

Mhadei River Basin:  ‘प्रवाह’ची कर्नाटकात म्हादई खोऱ्याला भेट
Mhadei River: म्हादई ‘प्रवाह’कडून विर्डी धरणाची पाहणी

पारवाड नाल्‍याकडे दुर्लक्ष

१) पारवाड नाला पूर्वी गोव्‍याकडे यायचा, आता तो उलट्या दिशेने मलप्रभेत वळवला आहे. हा कळीचा मुद्दा गोव्‍याचे प्रतिनिधी सुभाष चंद्र यांनी मांडला, परंतु केवळ कळसा नाल्‍याची बंद केलेली तोंडे ‘प्रवाह’ला दाखवण्‍यात आली.

२) समितीने हलतारा नाल्‍याच्‍या पाहणीनंतर सुर्ला येथील प्रस्‍तावित ५ बंधाऱ्यांच्‍या ठिकाणी पाहणी केली. प्रत्‍यक्षात हे बंधारे कर्नाटकातील राखीव वन क्षेत्र व म्‍हादई अभयारण्‍य खोऱ्यात येते. तेथे प्रकल्‍पासाठी केंद्रीय वन्‍यजीव मंडळाची परवानगी आवश्‍‍यक आहे.

३) बंगळुरू येथे आज प्रवाहची बैठक होणार आहे. तेथे गोव्‍याने प्रखरपणे आपले आक्षेपाचे मुद्दे मांडणे आवश्‍‍यक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com