
Mhadei River Water Dispute Case Allegations
पणजी: पाच वर्षात ३.२ कोटी रुपये या खटल्याच्या नावावर खर्च केले आहेत, हा जनतेच्या कराचा पैसा आहे. खटला लढवण्यासाठी एखादा चांगला वकील व त्याला सहाय्यक हवा असतो. मुक्त गोव्यात असा खटला लढवण्यासाठी एकही लायक वकील सरकारला का सापडू शकला नाही,असा सवाल ‘म्हादई बचाव अभियान’च्या निर्मला सावंत यांनी आज पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
म्हादई नदी संदर्भात सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यावरून जनतेची सरकार फसवणूक करत आहे. सरकारच्या वेळकाढू धोरणामुळे हा खटला राज्य सरकार विरोधात जाण्याचीच भीती म्हादई बचाव अभियानाने आज येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केली. अभियानाच्या अध्यक्ष निर्मला सावंत म्हणाल्या, लवाजमा दिल्लीत पाठवून सरकार म्हादईवर पुरेसे गंभीर आहे असे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्यक्षात सरकार गंभीर नाही.
मुख्य अभियंता प्रमोद बदामी यांना सरकार वारंवार सेवावाढ का देत आहे. त्यांच्याशिवाय खात्याचे पानही हलू नये, असे कोणते कौशल्य त्यांच्याकडे आहे, असा प्रश्न उपस्थित करून त्या म्हणाल्या, सरकारला मुंबईचेच वरिष्ठ वकील का हवेत. ॲड. भोसले, प्रा. साखरदांडे यांनी आंदोलनाची गरज व्यक्त केली.
म्हादईचा खटला गोवा सरकार हरणार हे ठरून गेलेले आहे असे सांगून ॲड. भवानीशंकर गडनीस म्हणाले, म्हादई बचाव अभियानाच्या खटल्यातील एका आदेशात ‘जैसे थे’ स्थितीचा उल्लेख असल्याने कर्नाटकाचे हात बांधले गेलेत. त्यांनी आम्ही एवढा खर्च केला आहे आणि पेयजलासाठी पाणी आवश्यक आहे हे न्यायालयाला पटवून दिले तर तर तो उल्लेखही न्यायालय गाळू शकते. यानंतर बघत राहण्याशिवाय गोवा सरकारकडे पर्याय राहणार नाही.
म्हादई व्याघ्र प्रकल्प घोषित न करून सरकारने मोठी चूक केली आहे. सरकारच्या या कृतीमुळे म्हादई नदीच्या सर्वोच्च न्यायालयात असलेल्या खटल्यात गोव्याची बाजू कमकुवत झाली आहे. सरकारला त्याचे काही पडून गेलेले नाही. आम्ही कर्नाटकाने चालवल्याच्या हालचालींची माहिती दिल्यावर तेथे जाऊन पाहणी करणे एवढेच काम सरकार करते. ‘प्रवाह’ कडून संयुक्त पाहणीची मागणीही गोवा सरकार मंजूर करून घेऊ शकलेले नाही.
राजेंद्र केरकर,अभियानाचे सचिव
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.