Goa Buffalo Meat Trade: गोव्यात सात महिन्यात 1,505 म्हशींची कत्तल; कित्येक टन मांस विदेशात निर्यात

Goa Meat Export: जानेवारी ते जुलै २०२५ दरम्यान राज्यात १,५०५ म्हशींची कत्तल करण्यात आली. फेब्रुवारी २०२५ मध्ये इराकमध्ये २८.५ टन बोनलेस मांस निर्यात करण्यात आले.
Buffalo
Buffalo Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यात गेल्या सात महिन्यात एक हजार ५०५ म्हशींची कत्तल करण्यात आली आहे. दोन महिन्यात राज्यातून विदेशात २८.५ टन मांस निर्यात करण्यात आले आहे, अशी माहिती पशु संवर्धन आणि मत्स्यव्यवसाय मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी दिली आहे. विधानसभेत विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी लेखी उत्तर दिले आहे.

सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. मंत्री हळर्णकर यांनी दिलेल्या उत्तरानुसार, जानेवारी ते जुलै २०२५ दरम्यान राज्यात १,५०५ म्हशींची कत्तल करण्यात आली. फेब्रुवारी २०२५ मध्ये इराकमध्ये २८.५ टन बोनलेस मांस निर्यात करण्यात आले. दरम्यान, मार्चमध्ये निर्यात नोंद झाली नसल्याचे उत्तरात नमूद करण्यात आले आहे.

Buffalo
गुडघ्यावर बसून सभापतींना हात जोडले, विरोधक हौदात मांडीच घालून बसले; राणेंच्या TCP खात्यावरुन विधानसभेत हाय व्होलटेज ड्रामा

एप्रिलमध्ये ७३ म्हशी, मेमध्ये ६७९, जून महिन्यात १२६ आणि जुलैमध्ये आत्तापर्यंत १२६ म्हशींच्या कत्तलीतून निर्माण झालेले मांस निर्यात करण्यात आले, अशी माहिती मंत्री हळर्णकरांनी सभागृहात दिली.

उसगाव – फोंडा येथे असलेल्या गोवा मीट कॉम्पलेक्समध्ये केवळ म्हशींची कत्तल केली जाते असेही, मंत्र्यांनी स्पष्ट केले.

मीट कॉम्पलेक्समध्ये दिवसाला ३०० जनावरे कत्तल करण्याची क्षमता आहे. सध्या मीट कॉम्पलेक्सची जबाबदारी सनफेस अग्रोफूड्स प्रा. लि. यांच्याकडे असल्याची माहिती त्यांनी दिली. येथे अत्याधुनिक प्रक्रिया उपकरणे, पॅकेजिंग युनिट आणि फ्रिजिंग तंत्रज्ञान उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

Buffalo
प्रमोद सावंत यांचे वक्तव्य कर्नाटकच्या जनतेचा अपमान करणारे, केंद्राने मागच्या दाराने केलेले षडयंत्र; म्हादईवरुन सिद्धरामय्यांचा तिळपापड

गोव्यातून होणाऱ्या मांस निर्यातीवर २० ते २५ वर्षापूर्वी बंदी घालण्यात आली होती. दरम्यान, सर्व सोपस्कर पूर्ण झाल्यानंतर आता राज्यातून केवळ म्हशीचे मांस निर्यात केले जाते, अशी माहिती उत्तरात देण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

NEET Paper Scam
Goa Monsoon Preparedness
Goa Chief Minister’s t Scheme
pakistan approves donkey meat export to china
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com