CM Pramod Sawant म्हादई नदी वाचविण्यासाठी शक्य त्या सर्व गोष्टी करण्यात आल्या आहेत आणि केल्या जात आहेत. म्हादई ही समस्त गोमंतकीयांची माता आहे. त्यामुळे या नदीचे पाणी कोणत्याही स्थितीत वळवू देणार नाही, असा पुनरुच्चार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज केला.
गोवा पंचायत महिला शक्ती अभियानातर्फे आयोजित ‘गोवा स्टार महिला पुरस्कार -२०२३’ वितरण सोहळ्यात ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित लोकप्रिय गायिका हेमा सरदेसाई यांनी अचानक मुख्यमंत्र्यांना म्हादईबाबत प्रश्न विचारून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
त्या म्हणाल्या, ‘जर ते म्हादई नदी वाचवू शकले नाहीत तर हा पुरस्कार निरुपयोगी आहे. म्हादई नदी वाचविण्याच्या आमच्या मिशनला मुख्यमंत्र्यांनी पाठिंबा द्यावा.’
मिशन यशस्वी
पंचायत आणि नगरपालिका क्षेत्रात 33 टक्के आरक्षण बाजूला सारून ज्या महिला निवडून येत आहेत, त्या त्यांच्या मेहनतीमुळे व सामाजिक योगदानामुळे. महिलांच्या सहभागामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘स्वच्छ भारत’ उपक्रम यशस्वी झाला व ‘स्वयंपूर्ण गोवा’ मिशनही यशस्वी होत आहे. - डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
यांना मिळाला पुरस्कार :
गोवा स्टार वुमन्स अवार्ड 2023 मध्ये सर्वोकृष्ट बिगर सरकार संस्था गोवा सुधारो यांना पुरस्कार प्राप्त झाला. तर आशा वर्णेकर, गुंजन प्रभु नार्वेकर, दीपाली नाईक, प्रा. डॉ. मनस्विनी कामत, संध्या केणी माईनकर यांच्यासहित 60 महिलांना विविध क्षेत्रांतील योगदानाबाबत गौरविण्यात आले. अशा पुरस्कारांबाबत महिलांमध्ये जागृती करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.