Goa Liquor Seized: बनावट मद्यविक्रीचा सुळसुळाट

अबकारी खाते सुस्‍त : फरिदाबाद पोलिसांनी गोव्‍यात केला पर्दाफाश
Goa Liquor Seized
Goa Liquor Seized Gomantak Digital Team
Published on
Updated on

Goa Liquor Seized: राज्यात मोठ्या प्रमाणात बनावट मद्यविक्री होत असल्याचे अलीकडेच फरिदाबाद पोलिसांनी गोव्यात येऊन घातलेल्या छाप्यावरून उघड झाले आहे.

बनावट मद्यविक्री करणारे हे जाळे गोव्यासह इतर राज्यांत सुरू असल्याचे या पोलिसानी मुंबई व फरिदाबाद येथे केलेल्या कारवाईतून स्‍पष्‍ट झाले.

गोव्‍यात येणारे पर्यटक हे मद्य व काजूबिया आवर्जून खरेदी करतात. त्यामुळे राज्यातील किनारपट्टी भागात काही परप्रांतियांनी मद्यविक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे.

हल्लीच अबकारी खात्याने किनारपट्टी भागात अशा बनावट मद्यविक्री व्यावसायिकांविरोधात धडक मोहीम आखली होती. काही मद्यालयांमधून परवाना शुल्क न भरल्याप्रकरणी सुमारे साडेतीन लाखांची दारू जप्त केली होती.

Goa Liquor Seized
Goa Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेलच्या किमतीत किरकोळ बदल, गोव्यातील आजचे इंधन जर जाणून घ्या

ही मोहीम अशीच सुरू राहणार असल्याचे खात्याचे संचालक नारायण गाड यांनी सांगितले होते. मात्र त्यानंतर ही मोहीम मंदावली आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात किमती व महागड्या बाटल्यांतून बनावट मद्यविक्री केली जातेय.

फरिदाबाद पोलिसांनी गोव्यात मनिंदर सिंग याला अटक केल्यानंतर तो दिल्लीतील स्क्रॅप डीलरकडून किमती रिकाम्या बाटल्या घेऊन त्यामध्ये बनावट मद्य घालून त्या सीलपॅक करत होता हे उघड झाले आहे.

Goa Liquor Seized
37th National Games: ‘क्रीडा पर्यटन’ ठरेल गोव्याची नवी ओळख- सावंत

बनावट मद्यविक्री होत असल्याने आता अबकारी खात्याला मोठ-मोठ्या मद्यविक्रीच्या दुकानांतून मद्याच्या बाटल्यांची तपासणी करावी लागणार असल्याची माहिती या खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.

अबकारी खात्याकडून आतापर्यंत कळंगुट येथील मनिंदर सिंग याच्या दुकानासंदर्भात तक्रारी येऊनही कारवाई का झाली नाही? यावरून संशय व्यक्त केला जात आहे.

Goa Liquor Seized
Illegal Tax Collection: पणजी महापालिकेत चाललंय काय? पावती न देताच सोपोची वसुली?

ठोस पावले उचलण्‍याची गरज : दत्तप्रसाद नाईक

मनिंदरच्या दुकानातून मोठ्या प्रमाणात बनावट मद्यविक्री होत असल्याच्या तक्रारी अबकारी खात्याकडे आल्या होत्या. तरीसुद्धा अबकारी खात्याकडून कारवाई झाली नाही. याचे कारण गुलदस्त्यातच आहे. काही अधिकाऱ्यांचे या दुकानाच्या मालकाशी संगनमत असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मात्र फरिदाबाद पोलिसांनी त्याला जाळ्यात अडकविले आहे. त्यामुळे आता तरी राज्याच्या अबकारी खात्याने अशा व्यावसायिकांविरोधात ठोस पावले उचलण्याची गरज आहे, असे मत मद्य व्यावसायिक दत्तप्रसाद नाईक यांनी व्यक्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com