Panaji News : ‘म्हादई’प्रश्‍नी हलगर्जी निंदनीय; मनोज परब

Panaji News : गोवेकरांना ‘मोदी की गॅरेंटी’ देण्याची गरज
goa
goaDainik Gomantak
Published on
Updated on

Panaji News :

पणजी, म्हादईप्रश्‍नी सरकारकडून होणारा हलगर्जीपणा निंदनीय आहे. म्हादई नदी वाचवण्यासाठी भाजप सरकारने गोवावासीयांसाठी ‘मोदी की गॅरेंटी’ देण्याची गरज आहे, अशी मागणी रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे अध्यक्ष मनोज परब यांनी केली.

तसेच म्हादई नदीच्या पाणीप्रश्नावर चर्चा करण्यासाठी केवळ एकदाच सभागृह समितीची बैठक झाली, अशी माहिती सांतआंद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांनी दिली.

दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध पर्यावरणवादी राजेंद्र केरकर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता, ज्यात अलीकडेच खंदकांचा विकास आणि गोव्यातील म्हादई नदीच्या पाण्याचा प्रवाह कमकुवत करण्यासाठी कर्नाटक सरकारकडून कळसा-भांडुरा प्रकल्पावर काम सुरू केल्याचे त्यांनी दर्शविले आहे. या मुद्यावर रिव्होल्युशनरी गोवन्सने गुरुवारी (ता.२१) पत्रकार परिषद घेतली.

मनोज परब यांनी सांगितले की, कर्नाटक सरकारने म्हादई नदीचे पाणी गोव्याला कमी जाण्यासाठी कळसा-भांडुरा प्रकल्पात खंदक तयार करण्यास सुरवात केली आहे. सध्याचे सरकार या जागेची पाहणी करत नाही आणि या कामांवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरत आहे.

goa
Goa Politics: कुडचडेत काँग्रेस,भाजप कार्यकर्ते संभ्रमात

सांतआंद्रेचे आमदार वीरेश बोरकर म्हणाले की, नुकत्याच स्थापन झालेल्या गृह समितीने म्हादई नदीच्या पाणीप्रश्नाबाबत एकच बैठक घेतली. या समितीने कळसा-भांडुरा प्रकल्पाच्या जागेवरील परिस्थिती जाणून घेण्यासाठी चर्चा करून काही ठिकाणी पाहणी करायला हवी होती, ती झालेली नाही. भाजप आणि काँग्रेस पक्ष म्हादई नदी कर्नाटकला विकण्याच्या तयारीत आहे.

भाजप सरकारमधील राजकारणी गोवावासीयांसाठी म्हादई नदी वाचवण्याचे मोठे दावे करतात; पण आता भाजप सरकारने फक्त एकच ‘मोदी की गॅरेंटी’ द्यावी. या गॅरेंटीमध्ये म्हादई नदीचे पाणी भाजप कर्नाटकात वळवू देणार नाही आणि गोवावासीयांसाठी म्हादई नदी वाचवतील, असे सांगावे.

- मनोज परब, ‘आरजी’चे अध्यक्ष

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हादई नदी आपल्या आईसारखी असून म्हादई नदीचे पाणी वळवू देणार नाही, असे विधान केले होते. मात्र, आता कर्नाटक सरकार पाणी वळवण्याचा प्रयत्न करत असतानाही भाजप सरकार या प्रकरणावर मूग गिळून गप्प का बसले आहे.

- वीरेश बोरकर, आमदार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com