गोव्यातून मुंबईला जाणाऱ्या क्रूझवर मेक्सिकन नागरिकाला हृदयविकाराचा झटका, समुद्रातून रुग्णाचे बचावकार्य

Indian Coast Guard Medical Rescue Operation:मुरगाव बंदर सोडल्यानंतर 40 किलो मीटर अंतरावर मेक्सिकन नागरिक फर्नांडो क्रूझ मेंडेझ यांची तब्येत बिघडली.
Indian Coast Guard Rescue Operation
Indian Coast Guard Rescue Operation

Indian Coast Guard Medical Rescue Operation

भारतीय तटरक्षक दलाने सोमवारी (दि.19) संध्याकाळी गोव्याच्या किनारपट्टीजवळ वैद्यकीय बचाव मोहीम राबवली. क्रूझवर मेक्सिकन नागरिकाला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्याला सुरक्षितपणे बाहेर आणून पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

गोव्यातून मुंबईला जाणाऱ्या सेलिब्रेटी मिलेनियम या क्रूझवर ही घटना घडली, बचावकार्य करण्यात आले त्यावेळी क्रूझ किनारपट्टीपासून 40 किमी अंतरावर होते.

मेक्सिकन नागरिक फर्नांडो क्रूझ मेंडेझ (वय 35) याला क्रूझवर हृदयविकाराचा झटका आला. याबाबत गस्तीवर असलेल्या ICGS C-158 ला संपर्क करण्यात आला.

ICGS C-158 रात्री सोमवारी साडे नऊच्या सुमारास जहाजाजवळ पोहोचले, त्यानंतर ऑनबोर्ड रुग्णासह त्याची पत्नी आणि 01 वैद्यकीय परिचर यांच्यासह ICGS मुरगाव बंदराच्या दिशेने निघाले. ICGS रात्री साडे अकरा वाजता मुरगाव बंदरावर दाखल झाले.

रुग्णाला पुढील वैद्यकीय उपचारासाठी मुरगाव बंदरात प्रदान केलेल्या रुग्णवाहिकेकडे सुपूर्द करण्यात आले, असे तटरक्षक दलाने प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.

Indian Coast Guard Rescue Operation
Subhash Phaldesai Attack: मंत्री सुभाष फळदेसाई हल्ला प्रकरण! 20 जणांविरोधात गुन्हा दाखल

सेलिब्रेटी मिलेनियम क्रूझ गोव्यातून मुंबईच्या दिशेने निघाले होते. मुरगाव बंदर सोडल्यानंतर 40 किलो मीटर अंतरावर मेक्सिकन नागरिक फर्नांडो क्रूझ मेंडेझ यांची तब्येत बिघडली.

फर्नांडो यांना हृदयविकाराचा झटका झाल्याचे समजल्यानंतर प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी त्यांना रुग्णलयात दाखल करणे आवश्यक होते. तटरक्षक दलाच्या वतीने तात्काळ बचावकार्य करुन त्यांना रुग्णालयात दाखल केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com