Subhash Phaldesai Attack: मंत्री सुभाष फळदेसाई हल्ला प्रकरण! 20 जणांविरोधात गुन्हा दाखल

Subhash Phaldesai Attack: मायणा कुडतरी पोलिसांनी 20 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Minister Subhash Phal Desai Attack
Minister Subhash Phal Desai AttackDainik Gomantak
Published on
Updated on

Subhash Phaldesai Attack

सां जुझे द आरियाल, बेनाभाट येथे शिवरायांच्या पुतळ्यावरुन झालेल्या वादात मंत्री सुभाष फळदेसाई यांची अडवणूक करुन त्यांच्यवर माती आणि ढेकळ फेकण्यात आले. याप्रकरणी आता मायणा कुडतरी पोलिसांनी 20 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सां जुझे द आरियाल, बेनाभाट येथे बेकायदेशीरपणे जमाव करणे आणि दंगल निर्माण केल्याप्रकरणी मायणा कुडतरी पोलिसांनी 20 जणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

सां जुझे द आरियाल येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळा उभारण्यावरुन वाद झाला. पुतळ्याला विरोध करणाऱ्या जमावाने यावेळी मंत्री फळदेसाई यांची अडवणूक करुन घेरण्याचा प्रयत्न केला. तसेच, मंत्री परतत असताना त्यांच्यावर माती आणि ढेकळ फेकण्यात आले. या हल्ल्यात मंत्री फळदेसाई यांच्या डोक्याला किरकोळ जखम झाली.

धार्मिक सलोखा बिगडू नये म्हणून याप्रकरणी कोणतीही तक्रार दाखल करणार नाही अशी भूमिका मंत्री फळदेसाई यांनी घेतली होती.

शिवजयंतीला सां जुझे द आरियाल येथे काय घडलं?

सां जुझे द आरियाल, बेनाभाट येथे छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्यात आला. पुतळा उभारण्यासाठी पंचायतीची परवानगी नसल्याचा आरोप करत काही स्थानिकांनी या पुतळ्याला विरोध केला.

तसेच, खासगी जमिनीत भराव टाकून रस्ता करण्यास स्थानिकांनी विरोध केला. पुतळ्याला विरोध नाही पण, त्यासाठी परवानगी घेतली नाही, असे स्थानिक म्हणाले.

दरम्यान, पुतळ्याचे आनावरण केल्यानंतर मंत्री फळदेसाई माघारी जात असताना त्यांना घेराव घालत माती व ढेकळ फेकण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com