Goa Weather Updates: राज्यात अवकाळी पावसाचे सावट

8 ते 10 मार्चपर्यंत राज्यात तुरळक पाऊसाचा हवामान विभागाने वर्तवला अंदाज
Goa Weather Updates
Goa Weather UpdatesDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा: राज्यातील काही भागांत तुरळक पाऊसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 8 ते 10 मार्चपर्यंत राज्यात तुरळक पाऊस पडणार आहे. 8 व 9 मार्चला ताशी 40 किमी वेगाने वारे वाहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. (meteorological department has forecast rains in the state from March 8 to 10)

Goa Weather Updates
पणजी बसस्थानकात होणार दुचाकी पार्किंगची सोय

पुढील दोन दिवस राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने (Meteorological Department) वर्तवली आहे. हवामान खात्याने जारी केलेल्या माहितीनुसार, मंगळवार 08 मार्च रोजी गोवा राज्यात ढगाळ हवामानाची शक्यता असून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळणार आहेत.

यासोबत, नैऋत्य बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेला हवेच्या दाबाचं क्षेत्र मागील 06 तासांत 15 किमी प्रतितास वेगानं उत्तर-वायव्य दिशेनं सरकले आहे. म्हणुनच देशभरात अनेक ठिकाणी पावसासाठी पोषक हवामान तयार झालं आहे. याचाच परिणाम म्हणून आज तामिळनाडूचा किनारी प्रदेश, पुड्डुचेरी, कराईकल, दक्षिण आंध्र प्रदेश आणि रायसीमा परिसरात विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com