Mershi Porvorim Traffic: मेरशी-पर्वरी मार्गावर वाहतुकीचा फज्जा; अटल सेतू-उन्नत मार्गाचे पर्याय बंद होताच जुन्या रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

Mershi Porvorim Traffic Congestion: ‘अटल सेतू’वरून पर्वरीत उतरण्याचा मार्ग तसेच पर्वरीच्या ‘उन्नत’ मार्गावरून पर्वरीत खाली उतरण्याची सुविधा बंद केल्याने वाहतुकीचे प्रवाह पुन्हा जुन्या रस्त्यांवर वळले आहेत.
Porvorim elevated road traffic
Mershi Porvorim traffic jamDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: ‘अटल सेतू’वरून पर्वरीत उतरण्याचा मार्ग तसेच पर्वरीच्या ‘उन्नत’ मार्गावरून पर्वरीत खाली उतरण्याची सुविधा बंद केल्याने वाहतुकीचे प्रवाह पुन्हा जुन्या रस्त्यांवर वळले आहेत. त्यामुळे सध्या मेरशी चौक ते पर्वरी तसेच दिवजा चौक ते पणजी या अंतर्गत मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.

अटल सेतूवरून म्हापशाच्या दिशेने जाताना पर्वरी येथे खाली उतरण्याची सुविधा बंद करण्यात आल्याने पणजी, पर्वरी आणि म्हापसा मार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. मडगाव, बांबोळी, शिरदोन, सांतआंद्रे आदी भागांतून पर्वरी, कळंगुट, बागा, सुकूर, सिकेरी, वागातोर या भागांकडे जाणाऱ्या वाहनांना अटल सेतूचा थेट वापर करता येत नाही. त्यामुळे ही वाहने अटल सेतूवरून पुढे जाण्याऐवजी मांडवी नदीवरील जुन्या दोन्ही पुलांचा वापर करून पर्वरीकडे वळत आहेत.

Porvorim elevated road traffic
Goa Politcs: काँग्रेसने 'गोवा रक्षण यात्रा' नव्हे, 'आमदार राखण यात्रा' काढावी; 'आप'चा खोचक सल्ला, पक्षांतरांवरून निशाणा

परिणामी, सकाळच्या कार्यालयीन वेळेत तसेच सायंकाळी परतीच्या वेळी मांडवी नदीवरील पूल आणि त्यानंतरचा मार्ग वाहनांनी गजबजून जात आहे. दुसरीकडे, म्हापशावरून पणजीच्या दिशेने येणाऱ्या वाहनांसाठी पर्वरी उन्नत मार्गावरून पर्वरी येथे खाली उतरण्याची सुविधा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे उन्नत मार्गाचा वापर करणाऱ्या वाहनांना पणजीकडे जाण्यासाठी गिरी येथून पूर्वीच्या मार्गावर यावे लागते. परिणामी, गिरीमार्गावरील वाहतुकीचा भार अचानक वाढला आहे.

हॉटेल ‘मॅजेस्‍टिक’ येथे उन्नत मार्गावर जाण्याच्या आणि येण्याच्या दोन्ही बाजूंच्या मार्गिका बंद केल्याने वाहतुकीचे दोन्ही प्रवाह प्रभावित झाले आहेत. पणजीकडून पर्वरीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना अपेक्षित ठिकाणी खाली उतरता येत नसल्याने पर्यायी मार्गांचा वापर करावा लागतोय. त्याच वेळी म्हापशाकडून पणजीकडे येणाऱ्या वाहनांनाही उन्नत मार्गावरून पर्वरीमार्गे पणजी शहरात प्रवेश करता येत नसल्याने गिरीमार्गे जुन्या रस्त्यावरून यावे लागत आहे.

यामुळे पूर्वी तुलनेने कमी वाहतूक असलेल्या रस्त्यांवर वाहनांचा अतिरिक्त भार पडला आहे. विशेषतः मेरशी चौक ते पर्वरी या मार्गावर सकाळी आणि सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून, काही ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. अटल सेतू आणि पर्वरी उन्नत मार्गामुळे वाहतुकीचे प्रवाह वेगवेगळ्या दिशांना वळवून कोंडी कमी होण्याची अपेक्षा होती. मात्र, प्रवेश आणि निर्गमनाच्या सुविधा बंद केल्याने वाहतुकीचे हे प्रवाह पुन्हा जुन्या मार्गांवर एकत्र येत आहेत. त्यामुळे उन्नत मार्गावरील वाहतूक व्यवस्थेचा अपेक्षित लाभ मिळण्याऐवजी वाहनांना पर्यायी रस्त्यांचा वापर करावा लागत आहे.

Porvorim elevated road traffic
Goa Politics: 'गोवा रक्षण यात्रेने फरक पडणार नाही'; 2027नंतरही भाजपचेच सरकार येणार, विश्वजीत राणेंचा दावा

अटल सेतूचा वापर करून पर्वरीत सहज पोहोचण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने मांडवी नदीवरील जुन्या पुलांवरून येणाऱ्या वाहतुकीत वाढ झाली आहे. स्थानिक आणि बाहेरून येणारी वाहने एकाच मार्गावर आल्याने कोंडीची समस्या अधिक तीव्र होत आहे. वाहतूक व्यवस्थेतील या बदलांमुळे वाहनचालकांना अतिरिक्त अंतर कापावे लागत असून प्रवासाचा वेळही वाढला आहे. विशेषतः सकाळी आणि सायंकाळी या मार्गांवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना त्याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.

अटल सेतूवरून पर्वरीत उतरण्याचा मार्ग बंद

मडगाव, बांबोळी, शिरदोन, सांतआंद्रे आदी भागांतून पर्वरी, कळंगुट, बागा, सुकूर, सिकेरी आणि वागातोरकडे जाणाऱ्या वाहनांना अटल सेतूवरून थेट पर्वरीत उतरता येत नाही. त्यामुळे ही वाहने मांडवी नदीवरील जुन्या दोन्ही पुलांवरून पर्वरीकडे वळत आहेत.

उन्नत मार्गावरून पर्वरीत उतरण्‍याचा पर्यायही बंद

म्हापशावरून पणजीकडे येणाऱ्या वाहनांना पर्वरी उन्नत मार्गावरून पर्वरीत खाली उतरता येत नसल्याने गिरीमार्गे जुन्या रस्त्यावर यावे लागत आहे. हॉटेल ‘मॅजेस्‍टिक’जवळ उन्नत मार्गाच्या दोन्ही बाजूंच्या मार्गिका बंद केल्याने वाहतुकीचे दोन्ही प्रवाह प्रभावित झाले आहेत.

Porvorim elevated road traffic
Goa Politics: 'गोवा रक्षण यात्रेने फरक पडणार नाही'; 2027नंतरही भाजपचेच सरकार येणार, विश्वजीत राणेंचा दावा

लांबच लांब वाहनांच्‍या रांगा

अटल सेतू आणि पर्वरी उन्नत मार्गावरील प्रवेश-निर्गमन सुविधा बंद झाल्याने वाहतुकीचा भार जुन्या रस्त्यांवर आला आहे. मेरशी चौक ते पर्वरी या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत असून, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.

दिवजा चौक मार्गही प्रभावित

गिरीमार्गे पणजीकडे येणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याने दिवजा चौक ते पणजी या मार्गावरही वाहतुकीचा वेग मंदावला आहे. कार्यालयीन तसेच शाळा-महाविद्यालयांच्या वेळेत कोंडी वाढते. सायंकाळी शहरातून परतणाऱ्या वाहनांमुळे या मार्गावरील परिस्थिती आणखी बिकट होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com